शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Palghar bypoll: श्रीनिवास कुठे फसलास रे बाबा... मुख्यमंत्र्यांनी दाखवली शिवसेनेची जाहिरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2018 14:22 IST

माणिकपूरमधील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार टीका करुन सेनेच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.

माणिकपूर (वसई)- शिवसेनेच्या कालच्या पालघरच्या सभेत मुख्यमंत्र्यांची ऑडिओ क्लीप ऐकवण्यात आल्यावर आज मैदानात उतरलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या "मित्र" पक्षाने केलेल्या प्रत्येक आरोपाला प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे यांनी माझी ऑडिओ क्लीप मोडून तोडून दाखवली असे सांगत त्यांनी ती पूर्ण क्लीप उपस्थितांना दोन-तीनवेळा ऐकवली. आपण सत्तेत आहोत आपण सत्तेचा कधीही दुरुपयोग करणार नाही हे महत्त्वाचे वाक्य शिवसेनेने मुद्दाम वगळल्याचे उघड केले.वनगा परिवार आपल्या पक्षाबरोबर कायम असणार आहे. चिंतामण वनगा यांच्या दुःखद निधनानंतर त्यांच्या जागी त्यांचे पुत्र श्रीनिवास यांनाच आपला पक्ष तिकीट देणार होता, हे सेनेला माहिती होते तरिही त्यांनी आपला उमेदवार पळवला असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. तसेच श्रीनिवास वनगा यांना निकालानंतर मातोश्री निवासस्थानाची दारे बंद होतील... आताच शिवसेनेने त्यांना आपल्यातून वगळलं आहे, असं सांगत त्यांनी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेली शिवसेनेची जाहिरात दाखवली. मतांचे आव्हान करणाऱ्या या जाहिरातीतसुद्धा श्रीनिवास वनगांचे नाव किंवा छायाचित्र नसल्याचे दाखवत श्रीनिवास कोठे फसलास रे बाबा असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी सेनेवर टीका केली. वनगा परिवाराच्या मागे आपला पक्ष कायमच उभा राहिल असे त्यांनी सांगितले. पराभव दिसत असल्यामुळेच शिवसेना रडीचा डाव खेळत असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChief Ministerमुख्यमंत्रीBJPभाजपाShiv Senaशिवसेना