शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

बीडमधील गुन्हेगारी मोडणार, हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड शोधणार; फडणवीसांनी सांगितला अ‍ॅक्शन प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 15:22 IST

Devendra Fadnavis Speech:  बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीची पाळंमुळं खोदून काढणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

Beed Crime ( Marathi News ) :बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या एक ना अनेक चुरस कथा बाहेर येऊ लागल्या आहेत. जिल्ह्यात खून, दमदाटी, खंडणी, बेकायदा वाळू उपसा, खोटे गुन्हे दाखल करणे असे अनेक प्रकार होत असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सरकारची भूमिका मांडताना बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीची पाळंमुळं खोदून काढणार असल्याचं सांगितलं आहे. तसंच देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाईंडवरही कारवाई करू, असं आश्वासन दिलं आहे. यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारचा अ‍ॅक्शन प्लॅन सांगितला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "बीड जिल्ह्यात वाळूमाफिया, भूमाफिया अशा लोकांवर एक मोहीम हाती घेऊन संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल. तसंच या सगळ्या प्रकरणात आम्ही दोन पातळीवर कारवाई करणार आहोत. या हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आम्ही आयजी स्तरावरील पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एक एसआयटी गठित केली आहे. ही एसआयटी गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी करेल आणि दुसरीकडे, आम्ही न्यायालयीन चौकशीही करणार आहोत. इकोसिस्टमच्या अँगलने न्यायालयीन चौकशी होईल. तीन ते सहा महिन्यांत या प्रकरणांचा तपास पूर्ण केला जाईल," अशी घोषणा फडणवीस यांनी सभागृहात केली. 

फडणवीसांनी कालही दिला होता सूचक इशारा

"महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे. मात्र माझी सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून अपेक्षा एवढीच आहे की, खंडणीखोरांना पाठीशी घालू नका. बीड जिल्ह्यातील मस्साजोग इथं जी घटना घडली त्यावर मी उत्तर देणारच आहे. पण अशा प्रकारे गुंतवणूकदारांना त्रास देणे, खंडणी वसूल करणे अशा प्रकारच्या घटना घडल्या तर गुंतवणूक येणार नाही. जे सगळे वसूलीबाज आहेत, ते कोणा ना कोणाचा आसरा घेतात. त्यामुळे माझ्या पक्षासहीत सगळ्या पक्षाच्या लोकांना विनंती आहे की, आपण वसुलीबाजांना आसरा देण्याचं बंद केलं तर महाराष्ट्राची गती दुप्पटीने वाढेल. वसुली प्रकरणात जो असेल त्याच्यावर कठोर कारवाई होईल," असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल दिला होता.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणBeedबीडCrime Newsगुन्हेगारीDhananjay Mundeधनंजय मुंडे