शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

आदित्य ठाकरे यांच्या निवडणूक लढवण्याच्या चर्चेवर मुख्यमंत्र्यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2019 12:02 IST

गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे वरळी विधानसभेमधून निवडणुक लढवतील अशी चर्चा रंगलेली आहे.

नांदेड: गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे वरळी विधानसभेमधून निवडणुक लढवतील अशी चर्चा रंगलेली आहे. दरम्यान, शुक्रवारी शिवसेनेच्या वरळीमधील कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेनेचे प्रवक्ते अनिल परब यांनी आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभेतूनच निवडणुक लढवावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

विधानसभा निवडणुकीत वरळी विधानसभेतून जो उमेदवार निवडणुकीसाठी उभा राहील तोच महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री होईल असे वक्तव्य शिवसेनेचे प्रवक्ते अनिल परब यांनी या मेळाव्यात केले होते. त्यामुळे अनिल परबांनी केलेल्या या विधानाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता अनिल परब शिवसेनेचे अधिकृत प्रवक्ते आहेत का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे आगामी विधानसभेच्या तोंडावर युतीमध्ये मुख्यमंत्री पदावरुन आमने सामने येण्याची शक्यता आहे. 

गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या जनआर्शीवाद यात्रेद्वारे महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. त्यातच अनिल परब यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. तसेच आदित्य ठाकरे यांना वरळीतून उमेदवारी देण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी ही मागणी मान्य केल्यास शिवसैनिक या भागात दिवसाची रात्र करून विरोधकांचे डिपॉझिट जप्त करतील,असा शब्दही उद्धव यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा