मराठी माणसाच्या परिस्थितीला मुख्यमंत्री आणि भाजप जबाबदार - संजय राऊत 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 12:11 PM2023-10-02T12:11:22+5:302023-10-02T12:16:29+5:30

मराठी माणसाची महाराष्ट्रात ही परिस्थिती आहे, याला एकनाथ शिंदे आणि भाजप जबाबदार असल्याचे संजय राऊत म्हणाले. 

Chief Minister and BJP responsible for the situation of Marathi people - Sanjay Raut | मराठी माणसाच्या परिस्थितीला मुख्यमंत्री आणि भाजप जबाबदार - संजय राऊत 

मराठी माणसाच्या परिस्थितीला मुख्यमंत्री आणि भाजप जबाबदार - संजय राऊत 

googlenewsNext

मुंबई : एका मराठी महिलेला मुलुंडमधील शिवसदन सोसायटीमध्ये जागा नाकारल्याची घटना गेल्या आठवड्यात उघडकीस आली होती. आहे. या घटनेनंतर आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या घटनेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर निशाणा साधला आहे. मराठी माणसाची महाराष्ट्रात ही परिस्थिती आहे, याला एकनाथ शिंदे आणि भाजप जबाबदार असल्याचे संजय राऊत म्हणाले. 

संजय राऊत म्हणाले, "महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या परिस्थितीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप जबाबदार आहे. त्यामुळेच शिवसेनेला कमकुवत करण्यात आले. मुंबईमधील मराठी माणसाचा आवाज, ताकद संपवण्यासाठीच भाजपने शिवसेना तोडली आहे. शिवसेना तोडण्याचे मुख्य कारण म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्रात मराठी माणसाचा आवाज दाबला जाईल. एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक बेईमान आहेत, हे सर्व जबाबदार आहेत."

आगामी निवडणुकीत भारत-पाकिस्तान नाही, तर भारत-खलिस्तान असा मुद्दा येणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. ते म्हणाले, "आज कॅनडात सुरुवात झालीय, यानंतर ब्रिटनमध्ये आले, आता हळूहळू दिल्लीत येतील. मग 2024 पर्यंत संपूर्ण वातावरण खराब केल्यानंतर आता देशाला कसा धोका आहे आणि एकच आपला नेता आहे, बाकी कोणीच नाही? असे सांगत भाजप प्रचार करेल", अशा शब्दात संजय राऊत यांनी निशाणा साधला. 

याचबरोबर, "आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी 10 वर्षांपूर्वी पाकिस्तानबाबत बोलायचे, त्यावेळी आम्हाला गर्व व्हायचा की, पंतप्रधानांची छाती 56 इंचाची आहे आणि पाकिस्तानला ते संपवूनच टाकणार, पण आता या निवडणुकीत भारत-पाकिस्तान नाही, तर भारत-खलिस्तान असेल, याचीच तयारी सध्या देशात सुरू आहे", असे संजय राऊत म्हणाले. 

दरम्यान, राष्ट्रवादीचा फुटलेल्या गटातील काही लोकांना भाजपने काही काळासाठी निवडणूक आयोगात मेंबर केले असेल, असे म्हणत संजय राऊता यांनी थेट अजित पवार गटावरही निशाणा साधला. ते म्हणाले, "काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे काहीजण रोज नवनव्या तारखा द्यायचे. आता निर्णय आमच्याच बाजूनं लागणार, चिन्ह आम्हालाच मिळणार, अशी भाकितं करायचे. हे कोणत्या आधारावर सांगायचे? जणू यांना निवडणूक आयोगाचे मेंबर केले आहे, असे ते तारखा सांगायचे. आज बहुतेक फुटलेल्या राष्ट्रवादीच्या गटाला भाजपने निवडणूक आयोगाचे मेंबर करुन घेतले आहे, पण लक्षात घ्या संविधान अजून जिवंत आहे."

Web Title: Chief Minister and BJP responsible for the situation of Marathi people - Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.