शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उदयनराजे सातारच्या गादीचे छत्रपती, त्यांनी तात्काळ...; संजय राऊतांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 19:15 IST

आम्ही उदयनराजेंसोबत आहोत. भाजपात शिवप्रेमी असतील. छत्रपतींबद्दल आस्था, प्रेरणा असेल तर त्यांनी ताबडतोब राज्यपालांचा राजीनामा घेतला पाहिजे. सुधांशू त्रिवेदीची हकालपट्टी केली पाहिजे असं संजय राऊत म्हणाले.

मुंबई - खासदार उदयनराजेंनी मुंडकं छाटण्याची भाषा करण्याऐवजी सगळ्यात आधी भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यायला हवा. ज्या पक्षानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला त्या पक्षात राहणं योग्य नाही. आम्ही उदयनराजेंसोबत आहोत. त्यांनी भाजपात राहता कामा नये असं म्हणत शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी उदयनराजेंना सल्ला दिला आहे. 

खासदार संजय राऊत म्हणाले की, उदयनराजेंच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. भाजपाच्या अनेक लोकांनी मुंडकं छाटण्याची भाषा केलीय. हा संताप असतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत महाराष्ट्राच्या भावना तीव्र आहेत. त्या भावनांचा स्फोट उदयनराजे भोसले यांच्या वाणीतून होत असेल तर त्याकडे गांभीर्याने पाहायला हवं. उदयनराजे सातारच्या गादीचे छत्रपती आहेत. संभाजीराजे कोल्हापूरचे छत्रपती आहेत. त्यामुळे त्यांच्या मनातील चीड बाहेर येणे स्वाभाविक आहे. सामान्य माणसांना चीड आहे असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत मुंडकं छाटण्याची भाषा न करता सगळ्यात आधी भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला पाहिजे. ज्या पक्षाने छत्रपती शिवाजी महाराज या आमच्या दैवताचा अपमान केलाय. त्या अपमानाचं समर्थन केले जातेय. यावेळी त्या पक्षात राहणे योग्य नाही. भाजपात राहता कामा नये. आम्ही उदयनराजेंसोबत आहोत. भाजपात शिवप्रेमी असतील. छत्रपतींबद्दल आस्था, प्रेरणा असेल तर त्यांनी ताबडतोब राज्यपालांचा राजीनामा घेतला पाहिजे. सुधांशू त्रिवेदीची हकालपट्टी केली पाहिजे. पण हे होत नाही असंही राऊतांनी म्हटलं. दरम्यान, छत्रपतींच्या महाराष्ट्राची बदनामी केलीय जातेय. पंतप्रधानांना रावण म्हटल्यावर हा गुजरातच्या जनतेचा अपमान आहे असं मोदी म्हणतात. मग महाराष्ट्रात छत्रपतींचा अपमान होत असेल तर हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? आमच्या तीव्र भावना आहे. शिवसेनेचा उदयनराजेंशी संवाद सुरू आहे. लवकरच त्याबाबत कृतीशीलता दिसेल असंही सूचक विधान संजय राऊतांनी केले आहे. 

छत्रपतींच्या समाधीसमोर उदयनराजे आत्मक्लेश करणारछत्रपतींचा अवमान करत असतील तर हा अपमान आम्ही कदापी सहन करु शकत नाही. या लोकांचे मोठे उपकार व योगदान आहे. प्रत्येक चांगल्या कार्याला सुरुवात करतात. त्या छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांचा अवमान होतो ही गंभीर बाब असून त्यातून आम्हाला वेदना होत आहेत. त्यामुळे आत्मक्लेष करण्यासाठी आम्ही रायगडावर निघालो आहे. त्या ठिकाणी जाऊन वेदना मांडणार आहोत'' असं उदयनराजेंनी सांगितलं.

 

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपा