छत्रपती संभाजीराजे उदयनराजेंच्या पाठिशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 03:54 IST2017-07-24T03:54:59+5:302017-07-24T03:54:59+5:30

Raje, Magaradwsd

Chhatrapati ShivajiRaje Udayan Rajajan's Lessons | छत्रपती संभाजीराजे उदयनराजेंच्या पाठिशी

छत्रपती संभाजीराजे उदयनराजेंच्या पाठिशी

लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : खंडणी प्रकरणात खा. उदयनराजे भोसले यांना अटक होण्याची शक्यता असताना कोल्हापूरचे खा. संभाजीराजे हे उदयनराजेंच्या पाठिशी उभे राहिले आहेत. त्यांनी उदयनराजेंच्या समर्थनार्थ फेसबुकवर पोस्ट टाकली आहे.
संभाजीराजे यांनी म्हटले आहे की, काल रात्री छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याशी माझी चर्चा झाली. ज्या अडचणीचा ते सामना करत आहेत त्या अडचणीत कोल्हापूर छत्रपती घराणे पूर्णपणे त्यांच्यासोबत आहे. कुठल्याही संकटाचा सामना कसा करायचा, हे छत्रपती घराण्याला चांगले माहिती आहे. संकट हे आम्हाला नवीन नाहीत. लवकरच ते त्यामधून बाहेर येतील, याचा मला पूर्ण विश्वास आहे. याआधी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेस खासदार राजीव सातव यांनीही उदयनराजेंना पाठिंबा दिला आहे.

भूमिकेकडे लक्ष
खा. उदयनराजे हे सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करणार की, दोन-तीन दिवसांत स्वत:हून पोलीस
ठाण्यात हजर होतील किंवा
पोलीस स्वत:हून कारवाई करतील, याकडे सातारकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Chhatrapati ShivajiRaje Udayan Rajajan's Lessons