शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

"मी शिवरायांच्या चरणावर डोकं ठेवून माफी मागतो…’’, शिवपुतळा दुर्घटनेबाबत नरेंद्र मोदींनी व्यक्त केली दिलगिरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 15:40 IST

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालवण येथे शिवपुतळ्याला झालेल्या दुर्घटनेप्रकरणी शिवराय आणि शिवप्रेमींची माफी मागितली आहे. शिवरायांपुढे नतमस्तक होऊन मी माफी मागतो. जे झालं ते अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी आहे, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 

मालवणजवळील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे राज्यासह देशभरात संतापाची लाट उसळली होती. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारविरोधात विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान, आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालवण येथे शिवपुतळ्याला झालेल्या दुर्घटनेप्रकरणी शिवराय आणि शिवप्रेमींची माफी मागितली आहे. शिवरायांपुढे नतमस्तक होऊन मी माफी मागतो. जे झालं ते अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी आहे, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 

वाढवण येथील बंदराचं भूमिपूजन केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित करताना आपल्या भाषणाच्या सुरुवातीला मालवणमध्ये शिवपुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत माफी मागितली. नरेंद्र मोदी म्हणाले की, काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गामध्ये जे काही घडलं ते दुर्दैवी होतं. माझ्यासाठी, माझ्या सहकाऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही आहे. आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राजा महाराजा महापुरुष नाही आहेत. तर आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य देव आहेत. म्हणून मी आज माझे आराध्य देव असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची त्यांच्या चरणांवर मस्तक झुकवून माफी मागतो. ते पुढे म्हणाले की, आमचे संस्कार वेगळे आहेत. आम्ही ते लोक नाही जे या भारतमातेचे या भूमीवरील वीर सुपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अपशब्द बोलत असतात. त्यांचा अपमान करतात. देशभक्तांच्या भावनेला चिरडतात. वीर सावरकरांबाबत अपशब्द उच्चारूनही जे माफी मागायला तयार होत नाहीत. महाराष्ट्राच्या जनतेने आता त्यांचे संस्कार जाणून घ्यावेत. मात्र मी आज या भूमीवर येताच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर झुकून त्यांची माफी मागण्याचं काम पहिल्यांदा केलं आहे. तसेच जे जे लोक छत्रपती शिवाजी महाराज यांना आपलं आराध्य मानतात. त्यांच्या मनाला या दुर्घटनेमुळे ज्या वेदना झाल्या आहेत. त्यांचीही मी मस्तक नमवून क्षमा मागतो. माझे संस्कार वेगळे आहेत. आमच्यासाठी आमच्या आराध्य देवापेक्षा मोठं काहीच नाही आहे, असेही नरेंद्र मोदी यांनी सांगितले.   

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाsindhudurgसिंधुदुर्ग