शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 12:06 IST

Kirtankar Sangita Tai Jadhav Murder: छत्रपती संभाजीनगरतील वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव शिवारात असलेल्या एका आश्रमात महिला कीर्तनकारचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली.

छत्रपती संभाजीनगरतीलवैजापूर तालुक्यातील चिंचडगाव शिवारात असलेल्या एका आश्रमात एका महिला कीर्तनकारचा मृतदेद आढळून आल्याने खळबळ माजली. या महिला कीर्तनकारची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची पोलीस तपासात उघड झाले. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या गुन्ह्यातील आरोपीला अटक झाल्यानंतरच हत्येमागचे कारण समोर येईल.

महाराज ह.भ.प. संगीताताई पवार, असे हत्या झालेल्या महिला किर्तनकाराचे नाव आहे. आश्रमात घुसून संगीताताई यांची हत्या करण्यात आल्याची बातमी समजताच वैजापूरसह संपूर्ण संभाजीनगरमध्ये खळबळ माजली. या घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संगीताताई यांची हत्या का केली? या गुन्ह्यामागे कोण आहे? याचा पोलीस शोध घेत आहेत. आश्रमातील कर्मचारी आणि इतरांची चौकशी केली जात आहे. लवकरच या हत्येमागील गुन्हेगाराला अटक केली जाईल, असा विश्वास वैजापूर पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

संगीता  पवार या मागील दोन महिन्यांपासून चिंचडगाव येथील सदगुरु नारायणगिरी कन्या आश्रमात  वास्तव्यास होत्या. त्या अविवाहित असून, त्यांनी संन्यास स्वीकारला होता. परिसरात त्या कीर्तनकार म्हणून ओळखल्या जात होत्या आणि नियमितपणे कीर्तनाचे कार्यक्रम करत असत. दररोज रात्री त्या आश्रमातील आपल्या खोलीतच झोपत असत, परंतु बुधवारी रात्री त्या खोलीबाहेर झोपल्या होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी आश्रमाचे गेट आणि कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरीच्या उद्देशाने आलेल्या या व्यक्तींनी संगीता पवार यांच्या डोक्यात मोठा दगड टाकून त्यांची हत्या केली. यावेळी आश्रमाजवळील मोहटा देवी मंदिराची दानपेटीही चोरीला गेल्याचे  उघडकीस आले. गुरुवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मोहटा देवी मंदिराचे पुजारी शिवाजी चौधरी आश्रम परिसरात आले असता त्यांना आश्रमाचे गेट आणि कुलूप तोडलेले दिसले. आत प्रवेश केल्यानंतर त्यांना संगीता पवार रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्यांनी तातडीने गावकऱ्यांना आणि वैजापूर व विरगाव पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी श्वान पथकासह घटनास्थळी धाव घेतली. 

पोलिसांचा तपास सुरूघटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तात्काळ पंचनामा केला. संगीता पवार यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा बारकाईने तपास केला असता, मंदिराची दानपेटी चोरीला गेल्याचे आढळून आले. विरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.या घटनेमुळे चिंचडगाव आणि परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. संगीता  पवार या त्यांच्या कीर्तन आणि धार्मिक कार्यासाठी परिचित होत्या. त्यांच्या अकस्मात आणि क्रूर हत्येने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गावकऱ्यांनी पोलिसांना तातडीने या प्रकरणातील गुन्हेगारांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे विरगाव पोलिसांनी या प्रकरणी कोणतीही माहिती असणाऱ्या व्यक्तींना पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी श्वान पथकासह तपास यंत्रणा कार्यरत आहे. 

दीड महिन्यांपूर्वी तक्रार, दोन संशयित ताब्यातह.भ.प. संगीता पवार यांनी शेजऱ्यांपासून जमिनीच्या वादातून जीवितास धोका असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिस या दृष्टीने देखील तपास करत असल्याची माहिती आहे.  या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

परिसरात खळबळया घटनेचा तपास लवकर पूर्ण होऊन गुन्हेगारांना अटक होईल, अशी आशा गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या घटनेने परिसरातील धार्मिक स्थळांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आश्रम आणि मंदिरांसारख्या ठिकाणी रात्रीच्या वेळी पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याने अशा घटना घडत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास तीव्र करून लवकरात लवकर गुन्हेगारांना पकडावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. याप्रकरणी गिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMaharashtraमहाराष्ट्रvaijapur-acवैजापूरCrime Newsगुन्हेगारी