शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 11:46 IST

Chhatrapati Sambhajinagar Viral Video: एक-एक रुपया साठवून वयाच्या ९३ वर्षी आजोबांनी त्यांच्या बायकोला सोन्याची पोत केली.

प्राची पाटील / अमोल राऊत लोकमत न्यूज नेटवर्क

मंठा/जालना/ छत्रपती संभाजीनगर : हलाखीची स्थिती... भिक्षा मागून गुजराण; पण, आपल्या पत्नीवर निस्सीम प्रेम असणाऱ्या ९३ वर्षीय आजोबांना आपण बायकोला आयुष्यात एकही दागिना करू न शकल्याची खंत होती. त्यांनी १-१ रुपया साठवून सोन्याचा नाही पण सोन्याचा मुलामा असलेला दागिना घेतला. आजी-आजोबांचा हा व्हिडीओ रविवारी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. तेव्हा या दाम्पत्याच्या हसऱ्या चेहऱ्यामागची वेदना जगासमोर आली.

मूळचे जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील अंभोरा जहागीर येथील ९३ वर्षीय निवृत्ती सखाराम शिंदे व शांताबाई निवृत्ती शिंदे हे काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतात. नुकताच आजोबांनी एका सोन्याच्या दुकानात जाऊन आपल्या पत्नीसाठी दागिना खरेदी केल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर तुफान व्हायरल झाला. परिस्थिती नसतानाही आजोबांनी पत्नीची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.

भावुक करणारा व्हिडीओप्रथमदर्शनी गरीब वृद्ध दाम्पत्याने दुकानात प्रवेश करताच ते काही मागण्यासाठी आले असावेत, असे कर्मचाऱ्यांना वाटले. मात्र, आपल्याला पत्नीसाठी पोत खरेदी करायची आहे, असे सांगितले.  आजोबांचे पत्नीप्रेम पाहून दुकानमालकाने त्यांना पोत भेट म्हणून देत २० रुपये ‘आशीर्वाद’ म्हणून घेतले. त्यांच्यातल्या संवादाचा व्हिडीओ दुकानदाराने सोशल मीडियावर शेअर केला. त्याला २२.६ मिलियन व्ह्यूज मिळाले. हे वृद्ध दाम्पत्य आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे जात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

हवी माळ आणि वाटीसराफा व्यावसायिक नीलेश खिंवसरा ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, माझ्या एका शोरूममध्ये रविवारी हे आजी-आजोबा आले. काही तरी घे म्हणून आजोबा आजीला खुणावत होते. परंतु, ते येथून काही न घेताच निघून गेले. काही वेळानंतर ते माझ्या दुसऱ्या शोरूममध्ये आल्याचे कळाले. मी तेथे पोहोचलो. तेथे दोघांशी संवाद साधला. तेव्हा माळ आणि वाटी (मंगळसूत्र) घेण्यासाठी आल्याचे सांगितले. काऊंटरवर १ हजार १२० रुपये ठेवले. चिल्लर पैशांची पोटलीही पुढे केली. मी फक्त १० रुपयांच्या दोन नोटा घेतल्या. एक मुलगा निवर्तला. दुसरा व्यसनी असून लक्ष देत नसल्याचे म्हणाले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादViral Videoव्हायरल व्हिडिओSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट