शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अजितदादांचा एक मेसेज आला तर लगेच राजीनामा देईन; छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 15:25 IST

मराठ्यांना आरक्षण द्या त्यांना विरोध नाही. परंतु आमचे आरक्षण टिकवा यासाठी आम्ही लढतोय असं भुजबळ म्हणाले.

मुंबई - मी सरकारमध्ये असतानाच चॅलेंज करतो. मी सरकारलाही सांगितले. जिथे बोलायचे तिथे मी बोलतोय. मी मंत्रिपदाचा राजीनामा का देत नाही असं विचारले जाते. परंतु मी माझे नेते अजित पवारांना सांगितलंय. जेव्हा कधी तुम्हाला वाटेल छगन भुजबळांची अडचण होतेय. सरकारमध्ये अडचण होतेय. तुम्ही फक्त एक मेसेज पाठवा आणि माझा राजीनामा घ्या..हे मी आता सांगितले नाही तर जेव्हा अंबडला ओबीसींची सभा होती. त्या सभेअगोदर सांगून मी अंबडला गेलो असं विधान मंत्री छगन भुजबळांनी केले आहे.  

मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील राज्यभरात दौरा करतायेत.ठिकठिकाणी सभा घेत ते सरकारला अल्टिमेटमची आठवण करून देतायेत.पण त्याचसोबत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नका यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. भुजबळांनी जालनातील अंबड येथे सभा घेत मराठ्यांना ओबीसीत घेतल्यास परिणाम वाईट होतील असा इशारा दिला होता.त्यामुळे राज्यात मराठा-ओबीसी असा वाद निर्माण झाला. त्यात भुजबळांच्या भूमिकेमुळे सरकारमध्येच आलबेल नसल्याचे चित्र दिसून आले.भुजबळांच्या विधानावरून जरांगे यांनी सरकार भुजबळांना पाठिशी घालतंय का असा प्रश्न विचारला. आता या संपूर्ण प्रकरणावर भुजबळांनी जर माझ्यामुळे सरकार अडचणीत येतंय असं वाटत असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे असं थेट उत्तर दिले आहे. 

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, आमदारकी, मंत्रिपद हे आयुष्यात सर्वस्वी नाही. मंत्रिपदाने शिंगे फुटत नाही. ३५ वर्ष आमची ओबीसींसाठी लढाई आहे. मराठ्यांना आरक्षण द्या त्यांना विरोध नाही. परंतु आमचे आरक्षण टिकवा यासाठी आम्ही लढतोय. काही लोकांना मिळणारे शिक्षण, नोकरीतील आरक्षण जाणार. ओबीसींचा डेटा अपडेट नाही. केंद्र सरकारचा निधी ओबीसींना मिळत नाही. रात्री-बेरात्री सभा घेतल्या जातायेत, मुख्यमंत्री-गृहमंत्र्यांना विचारा. माझी लायकी काय, मी माळी आहे, दलित एसपी होतो, कारण त्याची लायकी नाही. सुतार, माळी, वंजारी यांच्या हाताखाली कामं करणे गुन्हा आहे हे नवीन तयार झाले. कोणी बोलायला तयार नाही. आमची लायकी नाही अशा शब्दात मनोज जरांगे पाटलांवर भुजबळांनी पलटवार केला. 

दरम्यान, सर्व नेते म्हणताये, ओबीसींना धक्का न लावता मराठा आरक्षण द्या. जरांगे पाटलांनी उपोषण केले. सुरुवातीपासून मला टार्गेट केले. मला रोज वेगवेगळे मेसेज येत होते. मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्या, ओबीसीत ३७५ जाती झाल्या, कुणाला त्यात काय मिळणार म्हणून मराठा समाजाला वेगळे असे आरक्षण द्या असं मी म्हटलं. हायकोर्टाने कायदा मान्य केला, सुप्रीम कोर्टाने नाकारला. त्यात काही दोष दूर करा, मी वेगळी भूमिका मांडली नाही. राज्यातील सर्व नेते ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या असेच भूमिका मांडतायेत. मला सातत्याने शिव्या देणे चालू आहे. पण नंतर आमदारांची घरे जाळली. प्रकाश सोळुंखे, सुभाष राऊत यांची घरे जाळली, राखरांगोळी काय असते हे ते मी पाहिले. एका दिवसात अख्खं बीड पेटलं. संदीप क्षीरसागर, योगेश क्षीरसागर, राष्ट्रवादी भवन जळून खाक झाले. त्यांच्या घरात लेकरं-बाळं नव्हती का? पोलिसांनी का बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे मग मी उठलो आणि सभा घेतली असं छगन भुजबळ यांनी म्हटलं. 

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जातीChhagan Bhujbalछगन भुजबळAjit Pawarअजित पवारManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील