शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
4
"मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
5
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
6
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
7
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
8
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
9
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
10
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
11
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
12
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
13
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
14
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
15
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
16
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
17
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
18
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
19
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
20
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...

हिंगोलीच्या सभेत छगन भुजबळांनी मांडला आक्रोश; "आज आपली लायकी काढली जातेय..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 15:30 IST

आमची लायकी काढतो, छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक मावळ्याकडे लायकी होती म्हणून स्वराज्यासाठी लढले असं भुजबळांनी म्हटलं.

हिंगोली - मी काही बोललो तर अनेकांना वाटते २ समाजात तेढ निर्माण करतोय. अरे बाबांनो, त्यांच्या १५-२० सभा झाल्यावर आमची सभा होतेय. आम्ही काही बोललो नाही. माझा खुटा उपटायला मी तुझे काय केले? फोनवरून शिव्या, मेसेज देतायेत. मला आलेल्या शिव्या गलिच्छ भाषेत आहेत. तुमची हिंमत असेल तर वाचा, सगळ्या महाराष्ट्राला कळू द्या असं मी पत्रकारांना म्हटलं. मी आणि माझे कुटुंब गेली २ महिने या शिव्या वाचतोय, ऐकतोय आम्ही कसं जगायचे? मी कुठे दगड मारला, टायर जाळला आम्ही काही केले नाही. ते जाळतायेत, घरदारे पेटवली त्यांना सांगा. पेटवायला अक्कल लागत नाही तर बनवायला अक्कल लागते अशा शब्दात मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली. 

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, माझी सर्वपक्षातील नेत्यांना विनंती आहे. अधिकाराच्या लढाईत निमंत्रण पाठवली जात नाही. त्याचा आत्मा जिवंत आहे ते स्वत:समर्थनात येतात. आपल्या अधिकारावर गदा येत असेल तर विरोध करायला हवा. नवीन निर्माण नेते आता बोलतंय, भुजबळ म्हातारा झालंय, सगळेच होणार आहेत. आमचे केस एका आंदोलनाने पिकले नाहीत. जितके केस तितकी आंदोलने छगन भुजबळांनी केलीय. आंदोलन मला नवीन नाही. दोन्ही बाजूने तुम्ही आम्हाला अडचणी आणतायेत. एकाबाजूला कुणबी दाखले द्या, तर दुसरीकडे बाळासाहेब सराटे हायकोर्टात जाऊन ओबीसी आरक्षणाविरोधात याचिका दाखल केलीय असं त्यांनी सांगितले. 

तसेच रोहित पवार हे नवीन नेत्यांना भेटायला गेलेत, तिथे संदीप क्षीरसागर यांनाही नेले. कदाचित बॉम्ब फेकले तिथे अर्धाच बंगला जळाला, एकही मेला नाही. माफ करा, कशाला गेला, तुझी बायकापोरं संकटात टाकली त्याला भेटायला का गेला? बीडमध्ये एवढी घरे जळाली, हॉटेल जळाली तिथे जाऊन बघायला हवे होते. धीर द्यायला हवा होता. निषेध करायला पाहिजे होता. मी अश्रू पुसायला गेलो तर आग लावायला गेलो असं म्हटलं. त्याने काहीही करावे त्याला बोलायचे नाही. मी दु:ख सांगितले तर बदनाम करायला लागले. ओबीसींना २७ टक्के आरक्षण आहे. सरकारी नोकरीत आकडेवारीनुसार, १ लाख ३० हजार जागांचा अनुशेष आहे. १० टक्के आरक्षण आर्थिक निकषावर आहे. त्यात कोण तर मराठा समाज, उरलेल्या ४० टक्क्यात मराठा समाज आणि आता आमच्या २७ टक्के आरक्षणातही मराठा समाज येतोय असं भुजबळांनी म्हटलं. 

दरम्यान, मराठा समाज १५ टक्के आयएएस, आयपीएस २८ टक्के, फॉरेन सर्व्हिस १८ टक्के, मंत्रालयात अ - ३७.५ टक्के, ब - ५२.५ टक्के, क - ५२ टक्के आणि ड -५५ टक्के लोक आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाने ५१०५ कोटी रुपये वितरीत केले. १० टक्के आर्थिक निकषावर आरक्षण आहे त्यात वेगवेगळ्या अभ्यासक्रमात ७८ टक्के मराठा समाज आहे. राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती २ लाख १३ हजार लाभार्थी आहेत. सारथी, मराठा महामंडळाला जे दिले ते महाज्योती आणि ओबीसी महामंडळाला द्या अशी मागणी छगन भुजबळांनी केली. 

आज आमची लायकी काढली जाते

आमची लायकी काढतो, छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक मावळ्याकडे लायकी होती म्हणून स्वराज्यासाठी लढले. महात्मा फुलेंची लायकी होती त्यांनी शिवरायांची समाधी शोधून काढली. शिवजयंती फुलेंनी सुरू केली. शाहीर अमर शेख यांनी दुसरा पोवाडा रचला, अण्णाभाऊ साठे यांनी तिसरा पोवाडा रचला. जे संविधान आम्ही मानतो, जे बाबासाहेब आंबेडकर दलित समाजाचे त्यांची लायकी नव्हती...कुणाची लायकी काढताय? पेशवाईला लोळवणारे महार सैनिक यांच्याकडेही लायकी होती. कपडे आमचा शिंपी शिवतो, तुमची शेतीची अवजारे सुतार बनवतो. वडार दगडावर घाव घालून पाटा वरवंटा तयार करतो, चप्पला चर्मकार बांधवांनी बांधली, घर बलुतेदारांनी बांधली आमची लायकी नाही? आज आमची लायकी काढली जाते अशा शब्दात भुजबळांनी जरांगे पाटील यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. 

मागासवर्गीयांच्या हाताखाली कसं काम करायचे, उपनिरिक्षक मराठा समाजाचा, एसपी मागासवर्गीय त्याने आता उपनिरिक्षकाला सलाम ठोकायचा. आमची लायकी नाही. हे शिकवताय तुम्ही...त्यावर बोलायला कुणी तयार नाही. हे गावबंदी...गावागावांत बंदी, एकालाही सोडत नाही. आमदार नारायण कुचे, रावसाहेब पाटील दानवे सगळ्यांना गावबंदी करणार. रोहित पवार, राजेश टोपे सगळे आले त्यांचे स्वागत करणार..असा आरोप भुजबळांनी केला. गावबंदी केल्यावर संविधानानुसार १ महिन्याची शिक्षा आहे. सरकार, पोलीस करणार आहे की नाही? संविधानातील १९ कलम काय सांगतोय...कुणालाही बंदी करता येणार नाही...काढा बोर्ड आणि ज्यांनी बोर्ड लावले त्यांना १ महिन्याच्या शिक्षेवर पाठवा अशी मागणी भुजबळांनी केली. 

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळOBC Reservationओबीसी आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील