शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

"...तर मातोश्री निवासस्थानच जेल म्हणून घोषित करायचे ठरले होते!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 08:30 IST

छगन भुजबळांनी सांगितले बाळासाहेबांच्या अटकेचे ''प्लॅनिंग''

ठळक मुद्देछगन भुजबळांनी सांगितले बाळासाहेबांच्या अटकेचे ''प्लॅनिंग''

मुंबई : शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांना तुरुंगात न्यायचे नाही, हे आमचे ठरले होते. त्यांनी जामीन मागितला तर जामीनला विरोधही करायचा नाही, असा निर्णय झाला होता. पण, कोर्टाने जामीन नाकारला, तर मातोश्री जेल म्हणून जाहीर करायचे, हे आम्ही ठरवले होते. गृहमंत्री असल्याने मला तसे अधिकार होते. एखाद्या वास्तूला जेल म्हणून मी जाहीर करू शकत होतो, असा गौप्यस्फोट अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.

लोकमत ऑनलाइनच्या ‘फेस टू फेस’ कार्यक्रमात भुजबळ यांची मुलाखत वरिष्ठ सहायक संपादक अतुल कुलकर्णी यांनी घेतली, त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर श्रीकृष्ण आयोगाची अंमलबजावणी करू, असे आम्ही शिवाजी पार्कवर जाहीर केले होते. १९९३ च्या दंगलीनंतर हा आयोग नेमण्यात आला होता. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांनी हा अहवाल फेटाळला होता. मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे सत्तेत होते, तेव्हा शिवसेनेविरोधातील अनेक फाइल्स बंद केल्या होत्या. मी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होतो, तेव्हा माझ्यासमोर ती फाइल आली. तेव्हा श्रीकृष्ण आयोगातील अनेक प्रकरणे आली होती. मी ज्या पदावर होतो तेव्हा मला ही कारवाई करावी लागली. कारण, श्रीकृष्ण आयोग आम्ही स्वीकारू, असे आम्ही जाहीर केले होते. त्यावेळी खा. संजय राऊत माझ्याकडे आले. आमचे बोलणे झाले. मलाही बाळासाहेबांना त्रास द्यायचा नव्हता. पण, निर्णय घेतला नसता तर अडचणीचे झाले असते. म्हणून, ‘मातोश्री’लाच तुरुंग घोषित करण्याची तयारीही केली होती. पण, ती वेळ आली नाही, असेही भुजबळ म्हणाले.

  • अटकेच्या घटनेनंतर बाळासाहेबांनी मला सहकुटुंब मातोश्रीवर जेवायला बोलावले. जेवणाच्या टेबलवर आमच्यातील वाद क्षणात नष्ट झाले.
  • ऑर्थर रोड जेलमधील दिवस कसे होते? जेलमधून त्यांनी कोणाला पत्र लिहिले होते...? या व अशा अनेक गोष्टींचे गौप्यस्फोट भुजबळांनी या मुलाखतीतून उघड केले आहेत.
टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळShiv SenaशिवसेनाBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेMumbaiमुंबई