छगन भुजबळ ‘नॉर्मल’; सेंट जॉर्ज रुग्णालयात १५ मिनिटांत तपासणी

By Admin | Updated: March 16, 2016 08:36 IST2016-03-16T08:36:58+5:302016-03-16T08:36:58+5:30

सक्तवसुली संचालनालयाने माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना अटक केल्यानंतर मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात

Chhagan Bhujbal 'Normal'; Check in St. George's Hospital for 15 minutes | छगन भुजबळ ‘नॉर्मल’; सेंट जॉर्ज रुग्णालयात १५ मिनिटांत तपासणी

छगन भुजबळ ‘नॉर्मल’; सेंट जॉर्ज रुग्णालयात १५ मिनिटांत तपासणी

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना अटक केल्यानंतर मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात तपासणीसाठी नेले. भुजबळ यांच्या आरोग्य तपासणीचा अहवाल नॉर्मल आल्याची माहिती सेंट जॉर्ज रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जे.बी.भवानी यांनी ‘लोकमत’ला दिली. सर्व तपासण्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याने केल्या. त्यानंतर तपासणी अहवाल तत्काळ पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला. सर्व अहवाल सामान्य असल्याचे डॉ. भवानी यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: Chhagan Bhujbal 'Normal'; Check in St. George's Hospital for 15 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.