शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळ पुन्हा अडचणीत, महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी उच्च न्यायालयाची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 07:00 IST

Chhagan Bhujbal : नाशिक लोकसभा मतदारसंघातून अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची चर्चा असतानाच, महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे.

 मुंबई - नाशिक लोकसभा मतदारसंघातून अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची चर्चा असतानाच, महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. या प्रकरणात भुजबळ, त्यांचा मुलगा पंकज, पुतण्या समीर भुजबळ व अन्य आरोपींना उच्च न्यायालयाने सोमवारी नोटीस बजावत २९ एप्रिल रोजी त्यास उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.

महाराष्ट्र सदनप्रकरणी विशेष न्यायालयाने ९ सप्टेंबर २०२१ रोजी छगन भुजबळ यांच्यासह सर्व आरोपींची दोषमुक्तता केली. न्यायालयाच्या या निर्णयाला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्या. एस. एस. मोडक यांच्या पीठाने ही नोटीस बजावली.

काय आहे प्रकरण? छगन भुजबळांनी मंत्रिपदाचा गैरवापर करून महाराष्ट्र सदन बांधण्यासाठी मेसर्स चमणकर यांना कंत्राट दिले आणि त्या मोबदल्यात भुजबळांच्या शेल कंपनीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यात आल्याचे एसीबीच्या निदर्शनास आले आणि त्याआधारे एसीबीने भुजबळांवर गुन्हा दाखल केला होता.छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी विविध कंत्राटांमधून भुजबळ कुटुंबीयांच्या कंपन्यांना रोख रक्कम लाचेच्या स्वरूपात मिळाल्याचा आरोप होता. प्रत्येक कंत्राटासाठी एसीबीने स्वतंत्र गुन्हा दाखल केला होता.त्यानंतर ईडीनेही ईसीआयआर दाखल केला. मात्र, भुजबळांना २०२१ मध्ये क्लीन चिट दिली होती. याविरोधात दमानिया यांनी उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली. 

थेट सर्वोच्च न्यायालयात धावउच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींनी आपण ही सुनावणी घेऊ शकत नाही, असे दमानियांना सांगितल्यावर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. अखेरीस सर्वोच्च न्यायालयाने ही बाब उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या निदर्शनास आणून द्या, अशी सूचना दमानिया यांना केली. 

पीडब्ल्यूडी विभागाचे तत्कालीन सचिव देशपांडे यांनी विशेष न्यायालयाने त्यांचा आरोपमुक्ततेचा अर्ज फेटाळल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने त्यांच्या याचिकेवर दोन आठवड्यांनी सुनावणी ठेवली आहे.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळNCPराष्ट्रवादी काँग्रेसCourtन्यायालयlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४