शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

जो आधीपासून दिशाहीन, तो दिशा काय दाखवणार?; छगन भुजबळांचा मनोज जरांगेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 12:07 IST

काही काळासाठी तुम्ही वादळ उठवू शकता, पण त्यातील सत्यता बाहेर आल्यानंतर ते वादळ तितक्याच वेगाने संपते असं त्यांनी सांगितले. 

नाशिक - Chhagan Bhujbal on Manoj Jarange Patil ( Marathi News ) जो पहिल्यापासून दिशाहीन आहे तो पुढची दिशा काय ठरवणार?, वारंवार मागण्या वाढवल्या जातात, त्याला न समजणारे विषय, न समजणारा अध्यादेश, त्याचा अर्थ, वेळोवेळी उधळलेला गुलाल हे पाहता सुरुवातीला निजामकाळातील कुणबी नोंदी, आधी मराठवाड्यातील लोकांना कुणबी प्रमाणपत्रे द्या, मग महाराष्ट्रातील सर्वांना कुणबी प्रमाणपत्रे द्या. मग ते वाढत वाढत गेले. त्यामुळे लोकसुद्धा आता म्हणतायेत, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलंय मग आंदोलनाची गरज काय? असा सवाल मंत्री छगन भुजबळांनी विचारला. 

छगन भुजबळांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं की, रोज उठलं की आंदोलन, आंदोलन..शेवटी जे आंदोलन करतात त्यांनाही रोज घरचे काम, पोटपाणी असतं की नाही. त्यामुळे कदाचित लोक कंटाळले असतील. आता त्याच्या आजूबाजूला राहणारे लोक बोलू लागलेत. लोकांच्या लक्षात आलेले आहे. या गृहस्थाचा अभ्यास नाही. उगीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेखाली बसून कुणाला शिव्या द्यायच्या, संत तुकाराम यांच्याबाबतीत चुकीचे बोलणे. मुख्यमंत्र्यांसह सर्वांना वाईट बोलणे या सर्व गोष्टी लोकांच्या लक्षात येतायेत. शेवटी महाराष्ट्र सुसंस्कृत आहे. काही काळासाठी तुम्ही वादळ उठवू शकता, पण त्यातील सत्यता बाहेर आल्यानंतर ते वादळ तितक्याच वेगाने संपते असं त्यांनी सांगितले. 

जाहिरातबाजीतून चिन्ह पोहचवण्याचा प्रयत्न 

निवडणुकीत तुतारी किती वाजेल याबाबत मी सांगू शकत नाही. या वयात आणि इतक्या शारिरीक अडचणी असताना शरद पवार रायगडावर गेले हे कौतुकास्पद आहे. नवीन चिन्ह मिळते, तेव्हा अशाप्रकारे समारंभ केला जातो. जेणेकरून त्याचा प्रचार, प्रसार होईल. माध्यमांमध्ये ते दाखवले, त्यातून जाहिरातबाजी झाली असा टोला मंत्री छगन भुजबळांनी शरद पवार गटाला लगावला. 

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण