शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

महाराष्ट्राच्या भूमीत कुणीही चाणक्य बिणक्य चालणार नाही, कारण...; राणेंच्या वक्तव्यावर भुजबळांची थेट प्रतिक्रिया

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: February 7, 2021 17:19 IST

“कुणी चाणक्य बिणक्या महाराष्ट्राच्या भूमीत चालणार नाही... आधी सरकार पाडून तर दाखवा, मग ठरवूया शिडी लावायची की शिडी बॉम लावायचा.” (Chhagan Bhujbal commented on Narayan Rane)

नाशिक - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोकण दौऱ्यावर होते. यापूर्वी खासदार नारायण राणे  (Narayan Rane) यांनी, "अमित शहा यांच्या पायगुणाने राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जावे आणि चांगले सरकार यावे," असे म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना, “कुणी चाणक्य बिणक्या महाराष्ट्राच्या भूमीत चालणार नाही. कारण, महाराष्ट्रातील जनतेने हे सरकार स्वीकारले आहे आणि जेव्हा जनता सरकार स्वीकारते, तेव्हा कुणीही हात लावू शकत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार मजबुतीने उभे आहे,” असे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले. (Chhagan Bhujbal commented on Narayan rane and devendra fadnavis statement)

येवला मतदारसंघात बांधण्यात आलेल्या नव्या तालुका पोलीस प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनासाठी भुजबळ आले होते. तेव्हा ते पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते. यावेळी त्यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला.

“आधी सरकार पाडून तर दाखवा”माजी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नुकतेच सरकार बनविण्यासाठी शिडीची आवश्यकता भासणार नाही, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचा भुजबळांनीही खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, “आधी सरकार पाडून तर दाखवा, मग ठरवूया शिडी लावायची की शिडी बॉम लावायचा.”

नारायण राणे विनोद करतात, माहीत नव्हतं - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही राणेंच्या उपरोक्त वक्तव्याचा समाचार घेतला आहे. "नारायण राणे हे आमचे जुने सहकारी आहेत. पण ते असे विनोद करतात, हे मला माहिती नव्हते. त्यांच्या वक्तव्याकडे विनोद म्हणूनच पाहावे. त्यापेक्षा अधिक लक्ष देण्याची गरज नाही", असा टोला शरद पवारांनी (Sharad Pawar) लगावला आहे.

नेमकं काय म्हणाले होते नारायण राणे? -अमित शहा महाराष्ट्रात, आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. तेव्हा त्यांच्या पायगुणाने हे सरकार जावे आणि एक चांगले, कर्तबगार आणि लोकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे सरकार महाराष्ट्रात यावे, अशी इच्छा नारायण राणे यांनी काल व्यक्त केली होती.  

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळNarayan Raneनारायण राणे Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार