शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

छगन भुजबळ आणि मनोज जरांगेंमध्ये पुन्हा जुंपली; एकमेकांवर वैयक्तिक हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 10:30 IST

मराठा-ओबीसी आरक्षणावरून भुजबळ आणि जरांगे पाटील सातत्याने एकमेकांवर टीका करत आहेत.

मुंबई - मराठा आरक्षणासाठी एकीकडे मनोज जरांगे पाटील आग्रही मागणी करतायेत तर दुसरीकडे मराठ्यांना वेगळे आरक्षण द्या ओबीसीमधून नको अशी भूमिका मंत्री छगन भुजबळ मांडत आहे. त्यात मागील २ महिन्यापासून राज्यात भुजबळ-जरांगे यांचे शाब्दिक युद्ध पाहायला मिळत आहे. त्यात आता दोघांनी एकमेकांवर वैयक्तिक हल्लाबोल केला आहे. बेवड्या, पिऊन पिऊन किडन्या किडल्या अशी बोचरी टीका भुजबळांनी जरांगेंवर केली तर भुजबळ हे मुर्खाचा मुकादम आहे असा पलटवार जरांगेंनी भुजबळांवर केला. 

भिवंडी येथील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ म्हणाले की, जरांगे आमची लायकी काढतात. काहीही बोलतो, मला येवल्याचा येडपाट म्हटलं. एक म्हण आहे 'आधीच मर्कट तशातच मद्य प्याला' आधीच माकड त्यात बेवडा प्यायला, काहीही बोलतो. अरे आमची लायकी तू काय काढतोस, काय तुझी हिंमत, काय बघणार आहे मला? तू तुझी तब्येत सांभाळ. बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडन्या किडल्या त्या सांभाळ. मला मारण्याच्या धमक्या, उघडपणे दादागिरी करतोय. हे अजिबात सहन केले जाणार नाही असं त्यांनी म्हटलं. 

त्यावर हा आधीच जातीवादी आणि तो मुर्खाचा मुकादमच आहे. महामुर्ख माणूस असल्याने त्याला येडपाट म्हणतो. माझ्या शरीराला जन्मल्यापासून दारूचा डाग नाही. हे शरीर जनतेसाठी लढून असं झालंय. तुझ्यासारखं लोकांचे रक्त पिऊन शरीर वाढले नाही.माकड काय करू शकतो हे रावणाला विचार, तुझीही लंका जळेल, नीट राहा असा पलटवार मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांवर केला आहे. 

ठाकरे गटाच्या नेत्याचा भुजबळांना टोलाछगन भुजबळ हे जे काही ओबीसी समाजाची बाजू घेतायेत त्यातला खरा ढोंगीपणा हा बाहेर येईल. त्यांची तब्येत लवकर बरी व्हावी अशी मी प्रार्थना करतो. परंतु यात भुजबळांना फारसा दोष नाही. भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने भुजबळांना बोलावून घेतले आणि सांगितले, तुम्ही जामिनावर आहात. त्यामुळे अजून आक्रमक व्हा. त्यामुळे भुजबळांना आक्रमक व्हावे लागतंय असा टोला ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी लगावला आहे. 

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण