शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

‘भानू फरसाण’चा खाद्यपदार्थ परवाना तपासणार , अग्निशमन दलही करणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 03:31 IST

खाद्यपदार्थ बनविण्याच्या दुकानाला लागणारा परवाना व ना-हरकत प्रमाणपत्र ‘भानू फरसाण’ या दुकान मालकाने घेतले होते की नाही, याची आता तपासणी करण्यात येणार आहे. एल विभागाचे वैद्यकीय अधिकारी आणि मुंबई अग्निशमन दलाकडून ही बाब तपासण्यात येत आहे. या बाबींची पूर्तता केली नसल्यास चौकशी करून संबंधित अधिकारी वर्गावर कारवाई करण्यात येणार आहे.

मुंबई : खाद्यपदार्थ बनविण्याच्या दुकानाला लागणारा परवाना व ना-हरकत प्रमाणपत्र ‘भानू फरसाण’ या दुकान मालकाने घेतले होते की नाही, याची आता तपासणी करण्यात येणार आहे. एल विभागाचे वैद्यकीय अधिकारी आणि मुंबई अग्निशमन दलाकडून ही बाब तपासण्यात येत आहे. या बाबींची पूर्तता केली नसल्यास चौकशी करून संबंधित अधिकारी वर्गावर कारवाई करण्यात येणार आहे.आगीची मुंबई अग्निशमन दलाकडून स्वतंत्र चौकशी करण्यात येईल. दुकानातील पोटमाळा अनधिकृत असल्याचे आढळल्यास, जबाबदार अधिकारी वर्गावर कारवाई करण्यात येणार आहे.खाद्यपदार्थांना आग-आग इलेक्ट्रिक वायरिंगच्या ठिकाणी आटोक्यात आणण्यात आली होती. दुकानात मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थ होते. ६० बाय ३०च्या या दुकानाला आगीने वेढले होते. आगीच्या तीव्रतेमुळे दुकान कोसळले. अग्निशमन दलाने १२ कामगारांना बाहेर काढत राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.नक्की काय घडले...4.16 वाजता पहाटे दुकानाला आग लागल्याचीमाहिती मुंबई महापालिकानियंत्रण कक्षाला पोलीस नियंत्रण कक्षाकडून प्राप्त झाली.4.17वाजता ही माहिती अग्निशमन नियंत्रण कक्षास देण्यात आली.4.18वाजता फरसाण दुकानास आग असून, यामध्ये आठ ते नऊ माणसे अडकल्याचे सांगण्यात आले.4.38वाजता आग विझल्याचा कॉल देण्यात आला. चार फायर इंजिन आणि चार टँकरच्या मदतीने आग विझविण्यात आली.आगीची चौकशी होणारउपायुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) आणि मुंबई अग्निशमन दलामार्फत या घटनेची चौकशी होणार आहे. यामध्ये कारखान्यासाठी आवश्यक सर्व परवानगी नसल्यास, तसेच पोटमाळा बेकायदा आढळल्यास संबंधित अधिकारी वर्गावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिका आयुक्त अजय मेहता यांनी दिला आहे.रमेश भानुशालीला अटक-साकीनाका पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी रमेश भानुशाली यास अटककरण्यात आली आहे.दोन्ही भाऊ ठारनईम मिर्झा आणि वसिम मिर्झा या दोन्ही भावांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. सहा महिन्यांपूर्वी हे दोघे या दुकानात कामाला लागले होते.तातडीने उपचार : रुग्णालयात ८ वाजेपर्यंत १२ मृतदेह आणण्यात आले होते. जखमी अवस्थेत कोणीही दाखल झाले नाही. डॉक्टर व कर्मचारी वर्गाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या होत्या. जखमी अवस्थेत कोणी आल्यास, त्यावर तातडीने उपचार सुरू करण्याची तयारी होती, अशी माहिती राजावाडी रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.उडी मारली अन् ‘तो’ वाचला... फरसाणच्या दुकानामधील सिलिंडरच्या स्फोटाचा आवाज ऐकताच, १३ कामगारांपैकी अखिलेश रामकिशोर तिवारी या कामगाराने दुकानाच्या खिडकीतून खाली उडी मारली. खिडकीतून बाहेर पडलेल्या अखिलेशचा जीव वाचला खरा. मात्र, या दुर्घटनेत तो जखमी झाला आहे. त्याला पायाला फ्रॅक्चर झाले असून, त्याच्यावरट्रॉमा वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत.धुरामुळे गुदमरून मृत्यू? : स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, आग लागली, तेव्हा हे कर्मचारी जागे होते. आगीच्या धुरामुळे श्वास गुदरमून त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर, त्यांचे शरीर आगीत भाजले गेले, परंतु आता शवविच्छेदन अहवालानंतर खरे कारण समोर येईल.

टॅग्स :fireआगMumbaiमुंबई