केबीसी घोटाळ्यातील चव्हाण दाम्पत्याच्या पोलीस कोठडीत वाढ

By Admin | Updated: May 13, 2016 18:25 IST2016-05-13T18:25:29+5:302016-05-13T18:25:29+5:30

भाऊसाहेब आणि आरती चव्हाण या दोघांना 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश नाशिकच्या न्यायालयाने दिले

Chavan's couple's police custody extended in KBC scam | केबीसी घोटाळ्यातील चव्हाण दाम्पत्याच्या पोलीस कोठडीत वाढ

केबीसी घोटाळ्यातील चव्हाण दाम्पत्याच्या पोलीस कोठडीत वाढ

ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 13- केबीसी घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार भाऊसाहेब आणि आरती चव्हाण या दोघांना 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश नाशिकच्या न्यायालयाने दिले आहेत. सिंगापूर येथून भारतात परतल्यानंतर भाऊसाहेब चव्हाणला विमानतळावर नाशिक पोलिसांनी अटक केली होती. आतापर्यंत सुमारे 200 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी चव्हाण दाम्पत्याला अटक केल्यानंतर 13 मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्यामुळे आज दोघांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. भाऊसाहेब चव्हाण पोलीस कोठडीत असताना त्याच्या बँक चार बँक लॉकरमधून 2 कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले.

Web Title: Chavan's couple's police custody extended in KBC scam