सीआयडीच्या विशेष महानिरीक्षकपदी चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2016 04:50 IST2016-07-31T04:50:20+5:302016-07-31T04:50:20+5:30

पोलीस महासंचालकपदी सतीश माथुर यांच्या नियुक्तीबरोबरच अन्य १४ वरिष्ट पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या शनिवारी करण्यात आल्या.

Chavan is the special inspector general of CID | सीआयडीच्या विशेष महानिरीक्षकपदी चव्हाण

सीआयडीच्या विशेष महानिरीक्षकपदी चव्हाण


मुंबई : पोलीस महासंचालकपदी सतीश माथुर यांच्या नियुक्तीबरोबरच अन्य १४ वरिष्ट पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या शनिवारी करण्यात आल्या. बिनतारी संदेश विभागाचे विशेष महानिरीक्षक विजय चव्हाण यांची राज्य गुन्हा अन्वेषण शाखेच्या महानिरीक्षकपदी तर नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेले डॉ. बी. जी. शेखर यांची अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यपदी बदली करण्यात आली आहे.
गृह विभागाच्यावतीने शनिवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आदेशामध्ये दहा सहाय्यक अधीक्षक व परिवेक्षाधीन सहाय्यक अधीक्षकांचा समावेश आहे. बदली झालेल्या अन्य अधिकाऱ्यांची नावे अशी : (कंसात कोठून-कोठे): शैलेश बलकवडे ( पोलीस उपायुक्त नागपूर, पोलीस अधीक्षक लोहमार्ग, नागपूर), उत्तम खैरमोडे (अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर- पोलीस अधीक्षक राज्य मानवी हक्क आयोग मुंबई), निमित गोयल (अकोला- पालघर उपविभाग), अक्षय शिंदे(नागपूर ग्रामीण- अक्कलकुवा, नंदूरबार), सिंगुरी आनंद (अहमदनगर-अंबेजोगाई, बीड), जयंत मीना (सोलापूर ग्रामीण-अचलपूर, अमरावती), निखील पिंगळे (गोंदिया-सोलापूर ग्रामीण), निलोत्पल वर्धा (अमळनेर-जळगाव), लोहित मतानी (नांदेड- रामटेक, नागपूर), अजयकुमार बन्सल (परभणी- पुसद), दीपक साळुंखे (रामटेक -बुलढाणा) व पंडीत कमलाकर (धर्माबाद-नांदेड) (प्रतिनिधी)
>प्रवीण गेडाम राज्याचे नवे परिवहन आयुक्त
प्रवीण गेडाम हे राज्याचे नवे परिवहन आयुक्त असतील. सध्याचे आयुक्त श्याम वर्धने शनिवारी सेवानिवृत्त झाल्याने रिक्त पदावर गेडाम यांची बदली करण्यात आली आहे. गेडाम हे नाशिक महापालिकेचे आयुक्त होते. तेथून त्यांची मुंबईत सहविक्रीकर आयुक्तपदी बदली करण्यात आली, पण ते रूजू होण्यापूर्वीच आता त्यांना परिवहन आयुक्तपदी पाठविण्यात आले आहे. श्यामलाल गोयल यांची नियुक्ती सामान्य प्रशासन विभागात अतिरिक्त मुख्य सचिवपदी करण्यात आली आहे. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Chavan is the special inspector general of CID

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.