अंगावरून कार जाऊनही चिमुरडी सुखरूप !

By Admin | Updated: July 10, 2015 02:53 IST2015-07-10T02:53:38+5:302015-07-10T02:53:38+5:30

आईमागोमाग रस्ता ओलांडत असताना एका चिमुरडीच्या अंगावरून एक मोटार गेली आणि तेथे असलेल्या सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला

Charmurdi car from Anga going car! | अंगावरून कार जाऊनही चिमुरडी सुखरूप !

अंगावरून कार जाऊनही चिमुरडी सुखरूप !

नाशिक : आईमागोमाग रस्ता ओलांडत असताना एका चिमुरडीच्या अंगावरून एक मोटार गेली आणि तेथे असलेल्या सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला... चालकाने गाडी तिथल्या तिथे थांबवून दोघा मायलेकींना मोटारीत बसवले आणि थेट रुग्णालय गाठले. १५ दिवसांच्या जीवन-मृत्यूच्या संघर्षामध्ये चिमुरडीचा विजय झाला अन् तिला जीवदान मिळाले.
वडाळा रोडवरील रहनुमा उर्दू शाळेच्या प्रवेशद्वारासमोर १८ जून दुपारी मारुती मोटारीने तीन वर्षीय बालिका जोया मुझफ्फर खान हिला धडक दिली. या घटनेत मोटारीची दोन्ही चाके बालिकेच्या अंगावरून गेल्याचे बघून प्रत्यक्षदर्शींचा अंगाचा थरकाप उडाला होता. परिसरातील नागरिकांनी आरडाओरड केल्यानंतर मोटारचालकाच्या ही बाब निदर्शनास आली व त्याने मोटार ताबडतोब उभी केली. पोटावरून गाडीची चाके गेल्याने अंतर्गत रक्तस्त्राव होऊन सूज आली होती. मात्र बालिकेचे नशीब बलवत्तर असल्याने ती वाचली.

Web Title: Charmurdi car from Anga going car!