नवीन फौजदारी कायद्यांतर्गत ३० सप्टेंबरपर्यंत १.३४ लाख गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 12:29 IST2025-11-08T12:28:58+5:302025-11-08T12:29:38+5:30
कायद्याच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अव्वल राहावा यासाठी प्रयत्न

नवीन फौजदारी कायद्यांतर्गत ३० सप्टेंबरपर्यंत १.३४ लाख गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: नवीन फौजदारी कायद्यांतर्गत ३० सप्टेंबरपर्यंत ६० दिवसांच्या आत १.३४ लाख गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र दाखल झाले, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या बैठकीत देण्यात आली. या कायद्याच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात अव्वल राहील याची दक्षता घ्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
वर्षा निवासस्थानी नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत बैठक पार पडली. बैठकीस गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव राजेश कुमार, अतिरिक्त मुख्य सचिव राजेश अग्रवाल, इक्बाल सिंग चहल, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती आदी उपस्थित होते.
नवीन कायद्याची सद्यस्थिती
- राज्यात २ लाख ८८४ पोलिस अधिकारी/कर्मचारी यांचे प्रशिक्षण पूर्ण.
- दूरदृष्टी संवाद प्रणाली व्यवस्था २१४८ कोर्ट रूम आणि ६० कारागृहांमध्ये उपलब्ध.
- घरबसल्या तक्रार नोंदवण्यासाठी ई-एफआयआरची सुविधा.
- कोणत्याही पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी झिरो एफआयआर सुविधा