शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भीमा-कोरेगाव खटल्यातील आरोपपत्र मुदतवाढ सुप्रीम कोर्टाकडून कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 01:13 IST

भीमा-कोरेगाव हिंसाचाराशी संबंधित खटल्यात आरोपपत्र दाखल करण्यास ९० दिवसांहून अधिक मुदत वाढवून देण्यास नकार देणारा मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी अपिलात रद्द केला.

मुंबई : भीमा-कोरेगाव हिंसाचाराशी संबंधित खटल्यात आरोपपत्र दाखल करण्यास ९० दिवसांहून अधिक मुदत वाढवून देण्यास नकार देणारा मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी अपिलात रद्द केला. त्यामुळे या प्रकरणात पहिल्या टप्प्यात अटक केलेल्या अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग यांच्यासह पाच आरोपींच्या अडचणी वाढल्या आहेत.या प्रकरणात पुणे पोलिसांनी गेल्या वर्षी ६ जून रोजी सुरेंद्र गडलिंग, प्रा, सोमा सेन, रोना विल्सन, महेश राऊत आणि सुधीर ढवळे या पाच आरोपींना ‘शहरी नक्षलवादी’ म्हणून अटक केली होती. ही अटक भारतीय दंड विधानाखेरीज बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वयेही (यूएपीए कायदा) केली गेल्याने पोलिसांना आरोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसांची मुदत होती. ही मुदत सप्टेंबरमध्ये संपत होती. मात्र तपास का पूर्ण होऊ शकला नाही, याची समर्पक कारणे देऊन पब्लिक प्रॉसिक्युटरने अर्ज केला, तर विशेष न्यायालय ही मुदत आणखी ९० दिवसांनी वाढवून देऊ शकेल, अशी ‘यूएपीए’ कायद्यात तरतूद आहे.त्यानुसार अर्ज केला गेला व पुण्याच्या विशेष न्यायालयाने मुदतवाढ मंजूर केली. मात्र गडलिंग यांनी त्याविरुद्ध केलेली याचिका मंजूर करून मुंबई उच्च न्यायालयाने ही मुदतवाढ रद्द केली होती. सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई, न्या. संजय कृष्ण कौल व न्या. एल. नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने बुधवारी हा निकाल जाहीर केला व उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द देला. परिणामी पुणे न्यायालयाचा मुदतवाढ देण्याचा निकाल कायम झाला.या सुनावणीत सरकारसाठी ज्येष्ठ वकील मुकुल रोहटगी व अ‍ॅड. निशांत कतनेश्वरकर यांनी तर आरोपींसाठी डॉ. अभिषेक मनु सिंघवी, आनंद ग्रोव्हर व इंदिरा जयसिंग या ज्येष्ठ वकिलांनी काम पाहिले.या निकालाचा परिणाम काय?मुदतवाढ न देण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालायने अंतरिम स्थगिती दिली होती. ती स्थगिती लागू असताना परंतु ९० दिवसांची मूळ मुदत संपल्यानंतर पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले होते. मुदतीत आरोपपत्र दाखल झाले नाही, तर आरोपींना हक्काने जामीन मिळू शकतो. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे पोलिसांनी सादर केलेले आरोपपत्र वाढीव मुदतीत सादर केलेले ठरले. परिणामी उपर्युक्त पाच आरोपींना आता हक्काच्या जामिनाऐवजी गुणवत्तेवर जामीन मिळविण्याचा खडतर मार्ग अवलंबावा लागेल. नेहमीच्या फौजदारी कायद्याच्या तुलनेत ‘यूएपीए’ कायद्यात जामिनाचे निकष अधिक कडक आहेत.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार