सांताक्रुझ, विलेपार्ले प्लॅटफॉर्म क्रमांकांत बदल

By Admin | Updated: March 3, 2017 01:59 IST2017-03-03T01:59:16+5:302017-03-03T01:59:16+5:30

पश्चिम रेल्वेने सांताक्रु्रझ आणि विले पार्ले स्थानकातील प्लॅटफॉर्मच्या क्रमांकांत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

Changes in Santa Cruz, Vile Parle platform numbers | सांताक्रुझ, विलेपार्ले प्लॅटफॉर्म क्रमांकांत बदल

सांताक्रुझ, विलेपार्ले प्लॅटफॉर्म क्रमांकांत बदल


मुंबई : प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने सांताक्रु्रझ आणि विले पार्ले स्थानकातील प्लॅटफॉर्मच्या क्रमांकांत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. प्लॅटफॉर्मचे क्रमांक हे आता पश्चिमेकडून पूर्वेला असतील. २0१६च्या डिसेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यातच अंधेरी स्थानकातील प्लॅटफॉर्मच्या क्रमांकांतही बदल करण्यात आले होते.
प्लॅटफॉर्मला एका रांगेत नंबर नसल्याने ट्रेन पकडताना प्रवाशांची धांदल उडत होती. अंधेरी स्थानकानंतर आता सांताक्रुझ, विले पार्ले स्थानकांतील प्लॅटफॉर्मच्या क्रमांकांतही बदल करण्यात येणार आहे. सांताक्रुझ स्थानकासाठी ५ मार्चच्या मध्यरात्री तर विलेपार्ले स्थानकात १२ मार्चच्या मध्यरात्रीपासून अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.
सांताक्रुझ स्थानकातील सध्याचा प्लॅटफॉर्म क्रमांक ५ हा नंतर १ तर प्लॅटफॉर्म क्रमांक ४ हा ६ म्हणून ओळखला जाईल.
विले पार्ले स्थानकातील सध्याचा प्लॅटफॉर्म क्रमांक ५ हा नंतर १ तर ४ नंबर प्लॅटफॉर्म हा ६ नंबरने ओळखला जाणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Changes in Santa Cruz, Vile Parle platform numbers