एमपीएससीच्या वेळापत्रकात बदल

By Admin | Updated: January 9, 2017 03:30 IST2017-01-09T03:30:04+5:302017-01-09T03:30:04+5:30

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०१७ मध्ये घेण्यात येणाऱ्या विक्रीकर निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक आणि वन सेवा या पदांच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

Changes in MPSC schedule | एमपीएससीच्या वेळापत्रकात बदल

एमपीएससीच्या वेळापत्रकात बदल

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०१७ मध्ये घेण्यात येणाऱ्या विक्रीकर निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक आणि वन सेवा या पदांच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. प्रशासकीय कारणास्तव हा बदल करण्यात आला असून विद्यार्थ्यांची त्याची नोंद घ्यावी, असे एमपीएससीतर्फे कळविण्यात आले आहे.
एमपीएससीच्या वतीने २१ नोव्हेंबर २०१६ रोजी स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यात विक्रीकर निरीक्षक -२०१६ या पदाची पूर्व परीक्षा २९ जानेवारी रोजी, तर मुख्य परीक्षा २८ मे रोजी घेतली जाणार असल्याचे नमूद केले होते. परंतु, विक्रीकर निरीक्षक पदाच्या मुख्य परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला असून आता ही परीक्षा २८ मेऐवजी ३ जून रोजी घेतली जाईल. त्याचप्रमाणे राज्य उत्पादन शुल्क गट क दुय्यम निरीक्षक पदाची पूर्व परीक्षा २ जुलै रोजी व मुख्य परीक्षा १५ आॅक्टोबर रोजी घेतली जाईल, असे जाहीर केले होते. मात्र, आता या पदाची पूर्व परीक्षा २८ मे रोजी तर मुख्य परीक्षा २४ सप्टेंबर रोजी घेतली जाईल.
महाराष्ट्र वन सेवा परीक्षा २०१७ या पदाची पूर्व परीक्षा ४ जून रोजी, तर मुख्य परीक्षा २४ सप्टेंबर रोजी घेतली जाणार होती. परंतु, बदललेल्या वेळापत्रकानुसार मुख्य परीक्षा १५ आॅक्टोबर रोजी होईल. विक्रीकर निरीक्षक व वन सेवा पदाच्या पूर्व परीक्षेच्या तारखांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. मात्र, शासनाकडून निश्चित कालावधीत परिपूर्ण मागणीपत्र प्राप्त झाल्यानंतरच वेळापत्रकानुसार पदे जाहीर करून परीक्षा घेतली जाईल, असेही एमपीएससीने स्पष्ट केले आहे.

Web Title: Changes in MPSC schedule