राज्यातील एमएचटी-सीईटीसह अन्य परीक्षांच्या तारखांमध्ये बदल; पाहा नवे वेळापत्रक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 07:56 AM2024-03-23T07:56:28+5:302024-03-23T07:57:02+5:30

इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग, एलएलबी अशा काही व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी राज्याच्या सीईटी सेलकडून घेतल्या जाणाऱ्या सीईटीच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे.

Changes in dates of other exams including MHT-CET in the state; Check out the new schedule | राज्यातील एमएचटी-सीईटीसह अन्य परीक्षांच्या तारखांमध्ये बदल; पाहा नवे वेळापत्रक

राज्यातील एमएचटी-सीईटीसह अन्य परीक्षांच्या तारखांमध्ये बदल; पाहा नवे वेळापत्रक

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग, एलएलबी अशा काही व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी राज्याच्या सीईटी सेलकडून घेतल्या जाणाऱ्या सीईटीच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. यापैकी फार्मसीच्या प्रवेशांकरिता घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटीतील पीसीबी गटाची परीक्षा २२, २३, २४ २८, २९, ३० एप्रिलला होणार आहे. याआधी ही परीक्षा १६ ते २३ एप्रिलदरम्यान होणार होती. तर इंजिनिअरिंगच्या प्रवेशाकरिता घेतली जाणारी पीसीएम गटाची परीक्षा २, ३, ४, ५, ९, १०, ११, १५, १६ मे अशी होणार आहे.

ही परीक्षा २५ ते ३० एप्रिलदरम्यान होणार होती. इतरही अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत. एमएएच=एएसी ही राज्यातील अप्लाइड आर्ट्स ॲण्ड क्राफ्ट्सकरिता घेतली जाणारी परीक्षा १२ मे रोजी होणार आहे. एमएएच-पीजीपी सीईटीची सुधारित तारीख काही काळाने घोषित करण्यात येईल.

सुधारित तारखा

     एमएएच-बीए, बीएससी, बीएड (चार वर्षांचा इंटिग्रेटेड कोर्स) – १७ मे 
     एमएएच-एलएल.बी. (पाच वर्षांचा इंटिग्रेटेड कोर्स) – १७ मे 
     एमएच-नर्सिंग – १८ मे 
     एमएएच-बीएचएमसीटी – २२ मे 
     एमएएच-बी.बीसीए, बीबीए, बीएमएस,बीबीएम – २७ ते २९ मे

Web Title: Changes in dates of other exams including MHT-CET in the state; Check out the new schedule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.