अभियांत्रिकी परीक्षांच्या तारखांमध्ये बदल

By Admin | Updated: April 11, 2016 02:38 IST2016-04-11T02:38:09+5:302016-04-11T02:38:09+5:30

पुणे विद्यापीठाने परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा २ मेऐवजी येत्या २६ एप्रिलपासून सुरू होणार

Changes in the dates of engineering exams | अभियांत्रिकी परीक्षांच्या तारखांमध्ये बदल

अभियांत्रिकी परीक्षांच्या तारखांमध्ये बदल

पुणे : उन्हाची तीव्रता वाढत जाण्याची शक्यता असल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा २ मेऐवजी येत्या २६ एप्रिलपासून सुरू होणार आहेत. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील काही गावांमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती आहे. त्यातही नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांश गावात नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. दुष्काळाच्या झळा बसत असल्यामुळे विद्यार्थ्यांनाही महाविद्यालयात जाताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. उन्हाचा चटका वाढल्याने काही महाविद्यालयात विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी झाली होती. विद्यापीठाने परीक्षा लवकर घ्याव्यात, अशी मागणी विद्यार्थी व महाविद्यालयांकडून केली जात होती. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षामंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली.

Web Title: Changes in the dates of engineering exams