शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

केवळ रंगात बदल : महिला चालक अन् महिला प्रवासीही दिसेनात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2017 9:59 PM

शहरातील रस्त्यांवर खास गुलाबी रंगाची रिक्षा फक्त महिला प्रवाशांसाठीच आणि महिलाच चालविणार, अशी अपेक्षा काही महिन्यांपूर्वी व्यक्त होत होती; परंतु प्रत्यक्षात या रिक्षा पुरुष चालक पुरुष प्रवाशांनाच घेऊन चालवीत आहेत. या रिक्षात पुरुषांचेच राज्य असल्याचे दिसते.

औरंगाबाद, दि. 10 - शहरातील रस्त्यांवर खास गुलाबी रंगाची रिक्षा फक्त महिला प्रवाशांसाठीच आणि महिलाच चालविणार, अशी अपेक्षा काही महिन्यांपूर्वी व्यक्त होत होती; परंतु प्रत्यक्षात या रिक्षा पुरुष चालक पुरुष प्रवाशांनाच घेऊन चालवीत आहेत. या रिक्षात पुरुषांचेच राज्य असल्याचे दिसते. त्यामुळे काळ्या रंगाच्या रिक्षा असताना गुलाबी रिक्षा आणून काय फरक पडला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.रिक्षा प्रवास हा महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनला आहे. या पार्श्वभूमीवर गुलाबी रिक्षा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यातून राज्यात टॅक्सी व्यवसायाप्रमाणे रिक्षा व्यवसायातही महिलाराज यावे, यासाठी प्रयत्न करण्यात आला. महिलांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, असा उद्देश गुलाबी रिक्षा सुरू करताना होता. त्यासाठी महिलांसाठी रिक्षांचे परवाने आरक्षित ठेवण्यात आले. या परवान्यांवरील रिक्षांना गुलाबी रंग निश्चित करण्यात आला.आरटीओ कार्यालयाकडून महिलांसाठी विशेष अशा गुलाबी रंगाच्या रिक्षांचे जवळपास २२ परवाने देण्यात आले. या गुलाबी रिक्षा फक्त महिलांसाठीच असतील. म्हणजे चालक महिलाच राहील आणि या रिक्षाने फक्त महिला प्रवाशांची वाहतूक होईल, असे सांगितले जात होते; परंतु शहरातील रस्त्यांवरील चित्र प्रत्यक्षात वेगळे आहे. अद्याप तरी गुलाबी रिक्षा चालविताना महिला चालक दिसत नाहीत. पुरुषांकडून या रिक्षा चालविण्यात येत आहेत. शिवाय त्यात पुरुष प्रवाशांचीच वाहतूक होत आहे. त्यामुळे गुलाबी रिक्षा भाड्याने देण्याचा प्रकार होत आहे, हे स्पष्टच. केवळ रिक्षांचा रंग बदलला आहे. महिला सुरक्षेचे कोणतेही पाऊल पडलेले नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.अधिकारी म्हणतात...गुलाबी रिक्षा कोणी चालवावी, त्यात प्रवासी कोण असावेत, याबाबत आरटीओ कार्यालयातील अधिका-यांकडून वेगवेगळी उत्तरे मिळतात. रिक्षा परवानाधारक महिला अथवा तिच्या पतीस ही रिक्षा चालविण्याची मुभा आहे, असे काही अधिका-यांचे म्हणणे आहे, तर दिवसभरात एका शिफ्टमध्ये परवानाधारक महिलेने रिक्षा चालविली पाहिजे, असे काही अधिकारी सांगतात.कोणीही चालवू शकतोपरवानाधारक महिलेने रिक्षा चालविली तर अधिक चांगले आहे; परंतु गुलाबी रिक्षा कोणीही चालवू शकतो. उत्पन्नाचे साधन मिळावे, या हेतूने महिलांना रिक्षा परवाने देण्यात आले. कोणत्याही प्रवाशाची वाहतूक करता येते.- निसार अहेमद, रिक्षाचालक संयुक्तसंघर्ष कृती महासंघ