शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

Chandrasekhar Bavankule: 'मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सल्लागाराने सहयोगी पक्षाच्या प्रतिष्ठेची लक्तरे जगजाहीर केली', चंद्रशेखर बावनकुळेंचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 10:30 IST

Chandrasekhar Bavankule: 'सीताराम कुंटे सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सल्लागार आहेत, म्हणूनच त्यांचा खुलासा गंभीर ठरतो.'

मुंबई: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)  पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी अनधिकृत याद्या पाठवायचे, असा गौप्यस्फोट राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांनी सक्तवसुली संचालनालयाला (Enforcement Directorate ) दिलेल्या जबाबात केल्याचे समोर आले आहे. 

'...म्हणून खुलासा गंभीर ठरतो'यावरुन आता भाजपने सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. 'सीताराम कुंटे सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Tahckeray) यांचे प्रधान सल्लागार आहेत. म्हणूनच त्यांचा खुलासा गंभीर ठरतो', असं मत भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी याबाबत ट्विट करुन सरकारवर टीकाही केली आहे.

'पक्षाच्या प्रतिष्ठेची लक्तरे जगजाहीर केली'तसेच, 'आपल्या माजी मुख्य सचिव आणि विद्यमान प्रधान सल्लागारानेच आपल्या सरकारमधील माजी गृहमंत्र्यांबद्दल एवढी स्फोटक माहिती ईडीसारख्या जबाबदार यंत्रणेला दिली आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देणे आता आवश्यक झाले आहे. आपल्या प्रधान सल्लागाराने आपल्याच सरकारमधील एका सहयोगी पक्षाच्या प्रतिष्ठेची लक्तरे अशी जगजाहीर केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे माननीय शरद पवार साहेबांना काय उत्तर देतील?', असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारला आहे.

ईडीसमोर काय म्हणाले सीताराम कुंटे ?ईडीसमोर दिलेल्या जबाबात सीताराम कुंटे यांनी सांगितले की, देशमुख हे गृहमंत्री असताना मला पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत याद्या पाठवायचे. त्यामध्ये संबंधित पोलीस अधिकाऱ्याची कुठल्या जागी आणि कोणत्या पदावर बदली करायची, हे नमूद केलेले असायचे. देशमुख यांचा स्वीय सहायक संजीव पालांडे याच्यामार्फत या अनधिकृत याद्या माझ्यापर्यंत पोहोचविल्या जात असत. मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अधीन काम करीत असल्याने संबंधित याद्या स्वीकारण्यास नकार देऊ शकत नव्हतो. देशमुखांकडून आलेली यादी ही पोलीस आस्थापना मंडळाच्या सर्व सदस्यांना दाखविली जात असे. तसेच, ही यादी देशमुख यांच्याकडून आल्याचे मी मंडळाच्या सदस्यांना तोंडी सांगायचो. त्यामुळे पोलिसांच्या बदल्या करताना या नावांचा समावेश केला जायचा, असे  कुंटे यांनी ‘ईडी’च्या चौकशीदरम्यान सांगितल्याचे समजते.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेUddhav Thackerayउद्धव ठाकरेAnil Deshmukhअनिल देशमुखEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय