चंद्रपुरातील वीज निर्मितीला ‘ग्रहण’
By Admin | Updated: November 25, 2014 01:34 IST2014-11-25T01:34:23+5:302014-11-25T01:34:23+5:30
चंद्रपूर जिल्हा कोळशाचा जिल्हा म्हणून देशभर प्रसिद्ध आहे. मात्र चंद्रपूर वीज केंद्राला हा कोळसा मुबलक मिळत नसल्याने वीज निर्मितीवर परिणाम होत आहे.

चंद्रपुरातील वीज निर्मितीला ‘ग्रहण’
रवी जवळे ल्ल चंद्रपूर
चंद्रपूर जिल्हा कोळशाचा जिल्हा म्हणून देशभर प्रसिद्ध आहे. मात्र चंद्रपूर वीज केंद्राला हा कोळसा मुबलक मिळत नसल्याने वीज निर्मितीवर परिणाम होत आहे. आजमितीस वीज केंद्रात दीड दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक आहे. याशिवाय रोज गरजेच्या तुलनेत पाच ते दहा हजार मेट्रीक टन कोळसा कमी पुरविला जात असल्याने वीज निर्मिती प्रभावित होत आहे.
चंद्रपूरजवळ उर्जानगर परिसरात चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्र उभारले. 2 हजार 34क् मेगाव्ॉट वीज निर्मितीची क्षमता असलेले हे आशिया खंडातील दुस:या क्रमांकाचे वीज निर्मिती केंद्र आहे.
कोळशाच्या जिल्ह्यात हे वीज केंद्र असल्याने पावसाळा वगळता या केंद्रातील वीज निर्मिती कमी होणो अपेक्षित नाही. मात्र या केंद्रातून क्षमतेएवढी वीज निर्मिती अपवादात्मक स्थितीतच होते.
या केंद्रात चार संच 21क् मेगाव्ॉट तर तीन संच 5क्क् मेगाव्ॉट वीज निर्मितीची क्षमता असलेले आहेत. 21क् मेगाव्ॉट क्षमता असलेल्या संचाला दररोज चार हजार मेट्रीक टन कोळसा लागतो तर 5क्क् मेगाव्ॉट क्षमता असलेल्या संचाला दररोज 12 हजार मेट्रीक टन कोळसा लागतो. कोळशाचा दर्जा सुमार असला तर दोन हजार 34क् मेगाव्ॉट वीज निर्मितीसाठी ढोबळमानाने सुमारे 45 ते 5क् हजार मेट्रीक टन कोळशाची गरज पडते. काही वेळा तर याहून कमी कोळसा येतो. यामुळे वीज निर्मिती तर प्रभावित होते आहेच. शिवाय कोळशाचा स्टॉकही रिकामा होत आहे.
केवळ 16क्5 मेगाव्ॉट वीज
च्4234क् मेगाव्ॉट वीज निर्मितीची क्षमता असलेल्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातून सध्या केवळ 16क्5 मेगाव्ॉट वीज निर्मिती होत आहे. सात संचांपैकी प्रत्येकी 21क् मेगाव्ॉट वीज निर्मितीचा पहिला व तिस:या क्रमांकाचा संच बंद आहे. उर्वरित संचांमधूनही क्षमतेएवढी वीज निर्मिती होत नसल्याची माहिती आहे.