शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियाने चंद्रकांतदादांची उडवली खिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 19:19 IST

vidhanparishadelecation, pune, chandrkantpatil, socialmedia, kolhapurnews पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघासह राज्यातील विधान परिषदेच्या सहापैकी चार जागा महाविकास आघाडीने जिंकल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडविणाऱ्या प्रतिक्रियांचा शुक्रवारी सोशल मीडियावर चांगलाच धुरळा उडाला. त्यांतील काही पोस्ट तर अवमानजनक होत्या.

ठळक मुद्देसोशल मीडियाने चंद्रकांतदादांची उडवली खिल्लीपाटील यांच्या अनेक विधानांनी या निवडणुकीतील चुरस वाढवली

कोल्हापूर : पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघासह राज्यातील विधान परिषदेच्या सहापैकी चार जागा महाविकास आघाडीने जिंकल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडविणाऱ्या प्रतिक्रियांचा शुक्रवारी सोशल मीडियावर चांगलाच धुरळा उडाला. त्यांतील काही पोस्ट तर अवमानजनक होत्या.आमदार पाटील यांनी जी विधाने केली होती, त्यांचेच त्यावेळचे व्हिडीओ शेअर करून त्यांवर अत्यंत तिखट, विनोदी प्रतिक्रिया, गाणी सोशल मीडियावर शेअर झाली. आमदार पाटील यांची महाविकास आघाडीने चंपी केली, आता तरी बाबा तुम्ही बोलणं बंद करा... वाट लावली तुम्ही. आता तरी शांत बसा... अशा कॉमेंटही शेअर झाल्या. त्यासोबतच ह्यसुन चंपा... सुन तारा... कोई जिता, कोई हरा... अरे बडा मजा आया... सुन लो मेरी बात...ह्ण असे गाणेही वाजवले.आमदार पाटील यांच्या अनेक विधानांनी या निवडणुकीतील चुरस वाढवली. ते वारंवार चुटकी वाजवून आपण अगदी सहज सहाच्या सहा जागा निवडून आणू शकतो, असे म्हणत असत. राज्यात सत्तांतर झाले आहे. लोकमानस बदलले आहे, याचे भान त्यांच्याकडूनही सुटले होते. त्यामुळे मी चुटकी वाजवली की लोकही भाजपच्या आणि आमच्या मागे पळत येऊन उभे राहतात, असाच काहीसा त्यांचा व्यवहार व बोलणेही होते.

मध्यंतरी त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दलही काही विधाने केली. पुणे पदवीधरची निवडणूक तर आपण पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये मोठ्या मताधिक्याने जिंकू व शिक्षक मतदार संघात टप्प्याटप्प्याने विजयापर्यंत पोहोचू असे ते जाहीरपणे सांगत असत.

ही निवडणूक सोडाच; यापुढील महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतही लोक महाभकास आघाडीला उचलून फेकून देतील,असे विधान ते करीत असत. प्रत्यक्षात लोकांनी भाजप व चंद्रकांत पाटील यांनाच तसे फेकून दिल्याचे या निकालामधून दिसून आले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाSocial Mediaसोशल मीडियाkolhapurकोल्हापूरVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक