शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा चंद्रकांत पाटलांची नियुक्ती, मुंबईचे अध्यक्षही ठरले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 12:44 IST

मुंबई भाजपा अध्यक्षपदाची मंगल प्रभात लोढा यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.  

मुंबई : भाजपा प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुंबईभाजपा अध्यक्षपदी मंगल प्रभात लोढा यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी ही घोषणा केली.  

राज्यात भाजपाची सत्ता गेल्यानंतर प्रदेशाध्यक्षपद बदलण्याची चर्चा सुरू झाली होती. तसेच, भाजपाच्या या प्रदेशाध्यपदाच्या शर्यतीत अनेकांची नावे चर्चेत होती. यामध्ये सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रेशखर बानवकुळे या नेत्यांचा समावेश होता. मात्र, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी पुन्हा राज्यातील भाजपाची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्याकडेच सोपविली आहे. तर, मुंबई भाजप अध्यक्षपदी मंगलप्रभात लोढा यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.   

दरम्यान, राज्यातील गेल्या विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात भाजपाला म्हणावे, तसे यश मिळवता आले नाही. तरीही भाजपा प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची पुन्हा नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे, चंद्रकांत पाटील हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे अत्यंत विश्वासू समजले जातात. तर, दुसरीकडे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगलप्रभात लोढा यांच्याऐवजी आशिष शेलार यांच्याकडे मुंबई भाजपा अध्यक्षपद देण्याची चर्चा होती. मात्र, मंगलप्रभात लोढा यांनाच मुंबई अध्यक्षपदी कायम ठेवण्यात आले आहे. 

टॅग्स :BJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटीलMangalprabhat Lodhaमंगलप्रभात लोढाMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र