'उद्धव ठाकरेंनी ऐनवेळी पत्रकार परिषद रद्द केली, तेव्हाच आम्हाला संशय आला होता...'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 03:15 PM2021-09-02T15:15:55+5:302021-09-02T15:32:25+5:30

Chandrakant Patil criticize Uddhav Thackeray: आधी मोदींच्या नावाने मतं मागायची आणि जिंकून आल्यावर काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जायचं.'

Chandrakant Patil criticize Uddhav Thackeray over mahavikas aghadi with ncp and congress | 'उद्धव ठाकरेंनी ऐनवेळी पत्रकार परिषद रद्द केली, तेव्हाच आम्हाला संशय आला होता...'

'उद्धव ठाकरेंनी ऐनवेळी पत्रकार परिषद रद्द केली, तेव्हाच आम्हाला संशय आला होता...'

googlenewsNext

अमरावती:भाजपासोबतची युती तोडून शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. या गोष्टीची सळ अजूनही भाजप नेत्यांच्या मनात आहे. ती वेळोवेळी भाजप नेत्यांच्या तोंडून बाहेर पडतच असते. आता परत एकदा भाजपा नेत्याने तो विषय उकरुन काढला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर पाठित खंजीर खुपसल्याची टीका केली आहे. चंद्रकांत पाटील आजपासून दोन दिवसांच्या अमरावती दौऱ्यावर आहेत.

 

ऐनवेळी पत्रकार परिषद रद्द केली
ते पुढे म्हणाले की, विधानसभा निकालाच्या 4 वाजता देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होती. त्यावेळी मी पुण्यातून येत होतो. पण, उद्धव ठाकरेंनी 4 वाजताची पत्रकार परिषद तुमची तुम्ही करा आणि माझी मी करतो असं म्हटले. तिथेच गडबड झाल्याचं लक्षात आलं. त्यावेळी त्यांनी सर्व मार्ग मोकळे आहेत असं म्हटलं. त्यांना वेगळाच मार्ग निवडायचा होता, तर आधी युती का केली ? विधानसभा निवडणुकीआधी युती करायची, मोदींच्या नावाने मते मागायची आणि जागा जिंकून आल्या की काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जायचं. सेनेनं विश्वासघात केला, विश्वासघाताचंच नाव पाठित खंजीर खुपसणं आहे, त्यात मी चुकीचं काय बोललो ?, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

शिवसेनेला भाजपाने मराठवाडा-विदर्भात मोठं केलं
पाटील पुढे म्हणाले की, सध्या भाजपाचा प्रवास स्वबळाचा आहे. आम्हाला आता कुणाकडूनही फसवलं जायचं नाहीये. आम्ही एकट्याच्या जीवावर लढणार आहोत. ही शिवसेना कुठं होती? मुंबईत होती. शिवसेनेला प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी बोट धरुन मराठवाडा विदर्भात आणलं आणि आता 56 वर तुम्ही मुख्यमंत्री होऊन बसलात आणि 105 वाल्याला टाटा, बाय-बाय केलं. त्यामुळे आम्हाला कुणाबरोबरही लढायचं नाही, असंही ते म्हणाले.
 

Web Title: Chandrakant Patil criticize Uddhav Thackeray over mahavikas aghadi with ncp and congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.