शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
3
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
4
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
5
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
6
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
7
"बिकिनी घालणं सोपी गोष्ट नाही, त्यासाठी कष्ट लागतात", पर्ण पेठे स्पष्टच बोलली
8
लाईफ इन्शुरन्स धारकांसाठी खूशखबर! पॉलिसी मध्येच सरेंडर केल्यास मिळणार पूर्वीपेक्षा अधिक पैसे
9
बुडणार नाही तास, शाळेतच मिळणार पास; ‘एसटी’चे एक पाऊल पुढे
10
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
11
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
12
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
13
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
14
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
15
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
16
Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
17
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
18
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
19
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
20
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन

चांदोली धरण जवळपास १०० टक्के भरले; धरणातून  ३२५० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2021 9:14 PM

धरण प्रशासनाकडून देण्यात आला नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 

सतीश नांगरे-लोकमत न्यूज नेटवर्क शित्तूर-वारूण: पावसाचे आगर म्हणुन संबोधल्या जाणार्‍या चांदोली धरण क्षेत्रात दरवर्षी चार ते पाच हजार मिलीमीटरपर्यंत पावसाची नोंद होते. आजअखेर धरण क्षेत्रात २६५२ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद येथील पर्जन्यमापण यंत्रावर झाली आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरले पाहिजे व पूर नियंत्रणही झाले पाहिजे या दृष्टीने धरण व्यवस्थापनाने दरवर्षीप्रमाणे पावसाचा अंदाज घेत केलेले योग्य नियोजन व पाण्याच्या कमीअधिक केलेल्या विसर्गामुळेच चांदोली धरण याहीवर्षी जवळपास १०० टक्के भरले आहे.

सध्या धरणाची पाणी पातळी ६२६.८० मीटरवर पोहचली आहे. ३४.४० टिएमसी पाणी साठवण क्षमता असलेले चांदोली धरण आज ९९.७२ टक्के भरले असून धरणात सध्या ९७१.४८२ द.ल.घ.मी. पाणीसाठा झाला आहे. गेल्या चोवीस तासात धरण क्षेत्रात ५० मी. मी. पाऊस पडला आहे. यामुळे धरणात ११२८९ क्युसेक्सने पाण्याची आवक सुरू आहे. सध्या धरणाच्या सांडव्यातून व पायथा विजगृहातून ३२५० क्युसेक्स प्रतिसेकंद पाणी वारणा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. 

वारणा धारणातून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वारणा डावा व उजवा कालवा, वाकुर्डे योजना व वारणा नदीत पाणी सोडले जाते. शाहुवाडी, शिराळा व वाळवा तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या शेती व पिण्याच्या पाण्यासाठी हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याकडे लोकांचे लक्ष लागून राहिलेले असते. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी धरण शंभर टक्के भरल्यामुळे लोकांची पाण्याची चिंता मिटली आहे.  

टि. एस. धामणकर - (शाखा अभियंता- वारणा पाटबंधारे, वारणावती) 

धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवावा लागणार आहे. नदीकाठच्या गावांना दिलेला सतर्कतेचा इशारा कायम आहे. 

टॅग्स :Damधरण