शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

राजू शेट्टी-मविआ मैत्रीची शक्यता संपुष्टात, ठाकरेंनी उमेदवार जाहीर केल्याने हातकणंगलेत चौरंगी लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 10:26 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे महाविकास आघाडीत जाण्याची शक्यता बुधवारी संपुष्टात आली. कारण उद्धव ठाकरे गटाने तेथे सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिली.

 मुंबई - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे महाविकास आघाडीत जाण्याची शक्यता बुधवारी संपुष्टात आली. कारण उद्धव ठाकरे गटाने तेथे सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिली. आता शिंदेसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने, मविआचे सत्यजित पाटील स्वाभिमानीचे राजू शेट्टी आणि वंचितचे डी. सी. पाटील अशी लढत तेथे होणार आहे. 

शेट्टी यांना महाविकास आघाडीत घेण्याचे अनेक प्रयत्न झाले पण दोन्ही बाजूंनी काही अटी, शर्ती होत्या, त्यावर चर्चाही झाली पण एकमत न झाल्याने शेवटी चौरंगी लढतीचे चित्र आता समोर आले आहे. शेट्टी यांनी मध्यंतरी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली होती. मविआने आपल्याला बाहेरून पाठिंबा द्यावा, अशी विनंती शेट्टी यांनी ठाकरेंना केली होती. 

असे म्हटले जाते, की ते मविआचा घटक पक्ष यासाठी होऊ इच्छित नव्हते की काँग्रेस व शरद पवार गटासोबत गेल्यास मतदारसंघात त्याचा फटका बसेल, साखर कारखानदारांच्या सोबत गेल्याचा आरोप होईल. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत गेल्याचा पूर्वी फटका बसला हा पूर्वानुभव त्यांच्या गाठीशी होता.

दुरावा वाढला मविआतील तिन्ही पक्षांनी आणखी काही मित्र जोडण्याचे प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही.मविआच्या जवळ आलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर महायुतीसोबत गेले आणि आता ते महायुतीचे परभणीत उमेदवार आहेत.वंचितचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर हेही मविआसोबत गेले नाहीत. मात्र, त्यांनी काँग्रेसच्या काही उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला. मविआच्या जवळ आलेले मित्र दुरावत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने यापूर्वीच दिले होते. 

...हा तर शेट्टींना धक्काच!कोल्हापूर : गेला महिनाभर हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महाविकास आघाडीत निर्माण झालेला गुंता बुधवारी सुटला. उद्धवसेनेने येथे ‘शाहूवाडी’चे माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांना रिंगणात उतरवले आहे. आघाडीचा पाठिंबा मिळेल, या आशेवर बसलेले ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांना हा धक्का आहे.

प्रबळ गट...सत्यजित पाटील हे मूळचे शाहूवाडी तालुक्यातील सरुडचे. त्यांचे मूळ घराणे काँग्रेसचे. सत्यजित यांचे वडील बाबासाहेब पाटील सरुडकर हे एकदा काँग्रेसकडून व एकदा शिवसेनेकडून आमदार झाले. त्यानंतर सत्यजित पाटील हे शिवसेनेकडूनच २००४ आणि २०१४ ला आमदार झाले. शाहूवाडी - पन्हाळ्यात त्यांचा आजही भक्कम गट आहे. 

संभाव्य लढतnधैर्यशील माने : महायुतीतील शिंदेसेनेचे उमेदवारnसत्यजित पाटील : मविआतील उद्धवसेनेचे उमेदवारnराजू शेट्टी : स्वाभिमानी शेतकरी संघटनाnडी. सी. पाटील : वंचित बहुजन आघाडी

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४hatkanangle-pcहातकणंगलेkolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीSatyajit Patilसत्यजित पाटीलlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४