शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 20:46 IST

ख्रिसमसला थंडीचे प्रमाण असणार कमी 

ठळक मुद्देपुण्यात ५ दिवस अत्यल्प पावसाची शक्यता.पुण्यात २२ ते २७ डिसेंबर दरम्यान आकाश सामान्यत: ढगाळ राहण्याची शक्यता

पुणे : बंगालच्या उपसागर व लगतच्या क्षेत्रात द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने रविवार व सोमवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे़. त्यामुळे राज्यातील तापमानात वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़. राज्यात सर्वात कमी किमान तापमान चंद्रपूर येथे १०.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे़. चंद्रपूर वगळता राज्यातील सर्व प्रमुख ठिकाणचे किमान तापमान हे सरासरीच्या तुलनेत अधिक नोंदविले गेले आहे़. मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे़. मध्य महाराष्ट्रातील प्रमुख ठिकाणच्या तापमानात ४ ते ५ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे़. कोकणातील तापमानात २ ते ३ अंश तर विदर्भातील किमान तापमानात १ ते २ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे़. २२ डिसेंबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़. विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे़. २३ डिसेंबर रोजी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़ .कोकण, गोव्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे़. २४ डिसेंबर रोजी मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़. २५ डिसेंबर रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे़. ़़़़़़़़़़राज्यात २२ ते २५ डिसेंबर दरम्यान विविध जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे़  पुणे, सातारा, नाशिक या तीन जिल्ह्यात २२ ते २५ डिसेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी अत्यल्प पावसाची शक्यता आहे़. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी या कोकणातील चार जिल्ह्यात २२ डिसेंबरला पावसाची शक्यता आहे़. औरंगाबाद, अहमदनगर येथे २२ व २३ डिसेंबर तसेच धुळे, जळगाव जिल्ह्यात २३ व २४ डिसेंबर आणि नंदूरबार जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अत्यल्प पावसाची शक्यता आहे़. ़़़़़़़़़़पुण्यात ५ दिवस अत्यल्प पावसाची शक्यताकडाक्याच्या थंडीत उबदार कपडे घालून मध्यरात्री ख्रिसमस सण साजरा केला जातो़. पण, यंदा २५ डिसेंबरच्या रात्री दमट हवामानामुळे थंडीचे प्रमाण कमी असणार आहे़. पुण्यात शनिवारी १५़९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ ते सरासरीच्या तुलनेत ५ अंश सेल्सिअसने अधिक आहे़.  

पुण्यात २२ ते २७ डिसेंबर दरम्यान आकाश सामान्यत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे़. रविवारी किमान तापमान १७ अंश तर, सोमवारी १८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे़. २२ ते २६ डिसेंबर दरम्यान आकाश ढगाळ राहून अत्यल्प स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़. 

टॅग्स :PuneपुणेWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनRainपाऊसTemperatureतापमान