शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पुढील ४ दिवस मेघगर्जनेसह गारपीटची शक्यता : मराठवाड्यात बहुतेक ठिकाणी पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 18:59 IST

राज्यात बुधवारी अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पावसाची शक्यता

ठळक मुद्दे गेल्या दोन तीन दिवसात तापमानात झाली होती वाढ

पुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील तुरळक ठिकाणी पुढील चार दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वार्‍यासह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.याबाबत पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपि यांनी सांगितले की, दक्षिण तामिळनाडु ते उत्तर महाराष्ट्रापर्यंत उंच भागात चक्रवाती हवा वाहत आहे. ही हवा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील बाष्प आपल्याकडे खेचून घेत आहे.  त्याचबरोबर गेल्या दोन तीन दिवसात तापमानात वाढ झाली होती. त्यामुळे स्थानिक अस्थिर वातावरण तयार झाले आहे. त्याचा परिणाम राज्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे. राज्यात बुधवारी अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पावसाची शक्यता आहे. 

इशारा२५ मार्च : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजेचा कडकडाट व सोसायट्या वार्‍यासह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. २६ मार्च : विदभाृत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारांचा पाऊस तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.२७ व २८ मार्च रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ़़़़़़़राज्यात गुरुवार, शुक्रवार व शनिवारी पालघर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, २५ ते २८ मार्च या काळात रायगड, सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, औरंगाबाद, जालना या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. सांगली येथे २५ व २६ मार्च रोजी पावसाची शक्यता आहे. नांदेड, लातूर, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यात काही ठिकाणी बुधवारी व शनिवारी पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पुणे शहरात हलक्या पावसाची शक्यतापुणे शहरात बुधवारपासून पुढे ६ दिवस आकाश सामान्यत: ढगाळ राहण्याची शक्यता असून मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे़ पुणे शहरात ३० मार्चपर्यंत आकाश ढगाळ राहून हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसFarmerशेतकरीTemperatureतापमान