शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

Balasahebs Assistant Champa Singh Thapa : बाळासाहेबांना सावलीसारखी सोबत करणारे 'सेवक' चंपासिंह थापा शिंदे गटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 18:18 IST

Balasahebs Assistant Champa singh Thapa And CM Eknath Shinde : बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू अशी ओळख असलेले चंपासिंह थापा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे.

एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. राज्यभरातून शिंदे गटाला पाठिंबा वाढत आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांचीही ताकद वाढताना दिसत आहे. दुसरीकडे पडलेल्या भगदाडातून पक्षाला सावरण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे प्रचंड सक्रीय झाले आहेत. याच दरम्यान आता उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. बाळासाहेब ठाकरे यांना सावलीसारखी सोबत करणारे 'सेवक' चंपासिंह थापा (Balasahebs Assistant Champa singh Thapa) यांनी आता शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. 

बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू अशी ओळख असलेले चंपासिंह थापा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. दसरा मेळाव्यासह अनेक जाहीर सभांमध्ये बाळासाहेबांच्या आसनामागे थापा विनम्रपणे उभे असल्याचं अनेकांनी पाहिलंय. त्यांना पाणी देणं, नॅपकिन देणं, चालताना हात धरून आधार देणं ही जबाबदारी थापा अगदी चोख बजावत.

नवरात्रीच्या निमित्ताने थापा ठाण्यामध्ये देवीच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे साहेबांना भेटलो. पहिल्यापासून शिवसेनेची सेवा करत होतो आता एकनाथ शिंदे साहेबांसोबत सेवा करणार असल्याचं थापा यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी थापा यांचं स्वागत केलं आहे. थापा यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचाराबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळेच जे काही सुरू होतं ते योग्य नसल्याने त्यांनी आमच्या सोबत येण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेPoliticsराजकारणBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे