रत्नागिरीत तरुणीवर चाकूहल्ला

By Admin | Updated: August 6, 2014 16:50 IST2014-08-06T16:49:44+5:302014-08-06T16:50:25+5:30

रत्नागिरी जिल्ह्यातील आंबगाव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील तरुणीवर तिच्या वर्गमित्रानेच चाकू हल्ला केल्याची घटना बुधवारी घडली.

Chakahala on a young woman in Ratnagiri | रत्नागिरीत तरुणीवर चाकूहल्ला

रत्नागिरीत तरुणीवर चाकूहल्ला

ऑनलाइन टीम

रत्नागिरी, दि. ६ - रत्नागिरी जिल्ह्यातील आंबगाव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील तरुणीवर तिच्या वर्गमित्रानेच चाकू हल्ला केल्याची घटना बुधवारी घडली. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रत्नागिरीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 
रत्नागिरी जिल्ह्यातील राजेंद्र माने महाविद्यालयात शिकणा-या रोहित भोहिते या तरुणाने त्याच्याच वर्गात शिकणा-या तरुणीवर चाकूने हल्ला केला. हे दोघेही आयटीच्या द्वितीय वर्षात शिकत होते. दोघेही मुळचे पाचगणीतील रहिवासी आहेत. एकतर्फी प्रेमप्रकरणातून हा हल्ला झाल्याचा संशय पोलिस व्यक्त करत आहे. 

Web Title: Chakahala on a young woman in Ratnagiri