दादर रेल्वे स्टेशनवर तरुणीवर चाकूहल्ला

By Admin | Updated: July 18, 2016 08:55 IST2016-07-18T08:55:39+5:302016-07-18T08:55:39+5:30

दादर रेल्वे स्थानकातलोकल ट्रेनच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या 23 वर्षीय तरुणीवर एका गर्दुल्ल्याने चाकूने हल्ला केला आहे

Chakahala on the girl at Dadar Railway Station | दादर रेल्वे स्टेशनवर तरुणीवर चाकूहल्ला

दादर रेल्वे स्टेशनवर तरुणीवर चाकूहल्ला

>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 18 - दादर रेल्वे स्थानकात तरुणीवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. लोकल ट्रेनच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या 23 वर्षीय तरुणीवर एका गर्दुल्ल्याने चाकूने हल्ला केला. फिरोज युसुफ शेख असं हल्लेखोराचं नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. रविवारी रात्री ही घटना घटना घडली. या घटनेमुळे लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित राहिला आहे. 
 
पुजा बाळकृष्ण पाखरे असं या पिडीत तरुणीचं नाव आहे. तिच्या मानेला दुखापत झाली असून उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पुजा दादर स्टेशनवरील प्लॅटफॉर्म नंबर 1 वर लोकलची वाट पाहत उभी होती. त्यावेळी एका गर्दुल्याने अचानक तिच्यावर चाकूने हल्ला केला. स्थानकावर उपस्थित प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवत  हल्लेखोर गर्दुल्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. रेल्वे पोलिसांनी गर्दुल्लाला ताब्यात घेतलं असून तपास करत आहे. 
 

Web Title: Chakahala on the girl at Dadar Railway Station