छगन भुजबळ जे.जे. रुग्णालयात दाखल

By Admin | Updated: September 18, 2016 05:13 IST2016-09-18T05:13:25+5:302016-09-18T05:13:25+5:30

छगन भुजबळ यांना शनिवारी सायंकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना आॅर्थर रोड कारागृहातून हलवून जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले

Chagan Bhujbal JJ Admitted to the hospital | छगन भुजबळ जे.जे. रुग्णालयात दाखल

छगन भुजबळ जे.जे. रुग्णालयात दाखल


मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील मुख्य आरोपी छगन भुजबळ यांना शनिवारी सायंकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना आॅर्थर रोड कारागृहातून हलवून जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी त्यांची प्रकृती खालावल्यावर त्यांची तपासणी करण्यात आली. भुजबळ यांना डोकेदुखी, अंगदुखीचा त्रास जाणवत होता. त्याचबरोबर त्यांना तापही होता. त्यामुळे त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्लेटलेट्स काही प्रमाणात कमी झाल्या असून त्यांच्या पुढील तपासण्या सुरू असल्याची माहिती जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने
यांनी दिली. सध्या भुजबळांवर मेडिकल इंटेसिव्ह केअर युनिट (एमआयसीयू) मध्ये उपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Chagan Bhujbal JJ Admitted to the hospital