बच्चू कडू यांनी उगारला नाशिकच्या मनपा आयुक्तांवर हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 14:13 IST2017-07-24T14:13:34+5:302017-07-24T14:13:34+5:30

प्रहार संघटनेच्या नेतृत्त्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे आमदार बच्चू कडू यांनी शिष्टमंडळासमवेत महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेतली.

Chachchu Kadu took over the Municipal Commissioner's control | बच्चू कडू यांनी उगारला नाशिकच्या मनपा आयुक्तांवर हात

बच्चू कडू यांनी उगारला नाशिकच्या मनपा आयुक्तांवर हात

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक / आॅनलाइन लोकमत : नाशिक महापालिकेने १९९५चा अपंग पुनर्वसन कायदा अद्याप अंमलात आणला नाही. तसेच अपंगांचा राखीव तीन टक्के निधी आजपर्यंत खर्च केला जात नसल्यामुळे मनपा मुख्यालयासमोर दुपारी बारा वाजेपासून धरणे आंदोलन सुरू आहे. प्रहार संघटनेच्या नेतृत्त्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे आमदार बच्चू कडू यांनी शिष्टमंडळासमवेत महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या शाब्दिक वादानंतर कडू यांचा संयम सुटला आणि त्यांनी थेट कृष्ण यांच्यावर हात उगारला. शिष्टमंडळाच्या कार्यकर्त्यांनी कडू यांना रोखले अन्यथा अनर्थ झाला असता. शरणपुररोडवरील महापालिकेच्या राजीव गांधी भवन मुख्यालयासमोर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जोरदार घोषणाबाजीमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

Web Title: Chachchu Kadu took over the Municipal Commissioner's control