शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगरातील धोकादायक इमारतींना स्थैर्यता प्रमाणपत्र बंधनकारक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 16:45 IST

प्लॉटधारकांत संभ्रमाचं वातावरण, इमारतीचा स्लॅब पडून झाली होती दुर्घटना.

ठळक मुद्देप्लॉटधारकांत संभ्रमाचं वातावरणइमारतीचा स्लॅब पडून झाली होती दुर्घटना.

उल्हासनगर : इमारतीचे स्लॅब पडून झालेल्या दुर्घटनेच्या पाश्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी धोकादायक इमारतीला स्थैर्यता प्रमाणपत्र बंधनकारक केले. मान्यताप्राप्त संरचनात्मक अभियंत्याकडून स्थैर्यता प्रमाणपत्र घेऊन महापालिकेला सादर करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले. उल्हासनगर महापालिका पावसाळ्यापूर्वी दरवर्षी धोकादायक इमारतीला नोटिसा देऊन, नागरिकांना इमारती खाली करण्याचे आवाहन करते. तसेच इमारत पडून जीवित व वित्तहानी झाल्यास नागरिकांना जबाबदार धरले. दरम्यान गेल्या १५ दिवसात मोहिनी व साईशक्ती इमारतीचा स्लॅब पडून १२ जणांचा बळी गेल्याने, सर्वस्तरातून महापालिकेच्या कारभारावर टीका झाली. अखेर आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी धोकादायक इमारती मध्ये राहणाऱ्या नागरिकांना २९ मे रोजी जाहीर आवाहन केले. धोकादायक इमारती मध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी मान्यताप्राप्त संरचनात्मक अभियंत्याकडून इमारतीची तपासणी करून तसेच इमारतीची दुरुस्ती करून स्थैर्यता प्रमाणपत्र महापालिकेला सादर करण्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान ऐन कोरोना महामारीत कोणत्या मान्यताप्राप्त संरचनात्मक अभियंत्याकडून धोकादायक इमारतीची तपासणी करावी?, असा प्रश्न व संभ्रम नागरिकांना पडला. महापालिकेनेच एखाद्या मान्यताप्राप्त सरंचनात्मक अभियंत्यांची नियुक्ती करून धोकादायक इमारतीची तपासणी करून तसेच दुरुस्ती सूचवून स्थैर्यता प्रमाणपत्र महापालिकेला परस्पर सादर करण्याची मागणी होत आहे. मोहिनी व साईशक्ती इमारतीचा स्लॅब कोसळून १२ जणांचा मृत्यू झाल्याने, शहरातील धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला. धोकादायक इमारतीला वाढीव चटईक्षेत्र मंजूर करून त्यांची पुनर्बांधणी करावी अशा मागणीने जोर धरला असून यातून हजारो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. महापालिका व राज्य शासनाने दुसरी घटना घडण्यापूर्वी ठोस निर्णय घेण्याची मागणीही होत आहे. 

धोकादायक इमारतीचे सर्वेक्षण, समिती स्थापन रेतीवर बंदी असतांना शहरात सन १९९२ ते ९८ दरम्यान उलावा रेतीतून अनेक इमारतीचे बांधकाम झाले. त्याच दरम्यान अवैध इमारतीचे तोडण्यात आलेल्या स्लॅबची दुरुस्ती करून प्लॉटची विक्री झाली. अशाच इमारतीचे स्लॅब पडण्याच्या दुर्घटना होऊन अनेकांचे बळी जात आहेत. अखेर आयुक्तांनी अशा इमारतीचे सर्वेक्षण करण्यासाठी प्रभाग समिती निहाय्य समिती स्थापन केली. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरBuilding Collapseइमारत दुर्घटनाAccidentअपघात