शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राचे पॅकेज म्हणजे आकड्यांचा खेळ : डॉ. अमोल कोल्हे यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 02:19 IST

कोरोनातून बाहेर पडण्याचा आराखडा अद्यापर्यंत केंद्राकडे नसल्याने लॉकडाऊन उघडल्यानंतर अधिक धोका वाढू शकतो

पिंपरी:  कोरोनाच्या तपासण्याची संख्या कमी आहे, त्यामुळे आपण स्वतला फसवितो की जगाला हे कळत नाही, तपासण्या वाढविण्याची गरज आहे. लॉकडाऊन हा कोरोनाला थांबविण्याचा एकमेव पर्याय नाही, हे आता सिद्ध झाले आहे. कोरोनातून बाहेर पडण्याचा आराखडा अद्यापर्यंत केंद्राकडे नसल्याने लॉकडाऊन उघडल्यानंतर अधिक धोका वाढू शकतो, अशी भिती शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.  केंद्राने दोन दिवसांपूर्वी जाहिर केलेले पॅकेज हे आकड्यांचा खेळ आहे, अशी टीकाही केली.पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सुरु केलेल्या ‘कोविड १९ वॉर रुम’ला खासदार डॉ. कोल्हे यांनी भेट दिली. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यांना कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने महानगरपालिका करीत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. डॉ.  कोल्हे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने राबविलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले.यावेळी विरोधी पक्षनेते  नाना काटे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे,  माजी महापौर संजोग वाघेरे,  महापालिकेचे अतिरिक्त आयुक्तअजित पवार, संतोष पाटील, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, डॉ. वर्षा डांगे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोडदे, संदीप खोत, स्मिता झगडे आदी उपस्थित होते. डॉ. कोल्हे यांनी कोरोनाबाबत नगरसदस्यांच्या समस्यांबाबत अडचणी विचारणा केली. त्यावर हर्डीकर यांनी कोरोनाची सुरुवात झाल्यापासून ते आत्तापर्यंत केलेली कार्यवाही आलेल्या अडचणी त्यावर मार्ग काढून केलेल्या कामाबद्दल सविस्तर माहिती दिली.केंद्राच्या समितीला डॉ. कोल्हे यांनी प्रमुख सहा सूचना केल्या होत्या. त्यापैकी स्थलांतरित कामगाराचा प्रश्न सोडून अन्य विषयांवर कार्यवाही झाली नसल्याचे त्यांनी बोलून दाखविले. डॉ. कोल्हे म्हणाले, ‘‘अधिक काळाचा लॉकडाऊन हा देशाच्या हिताचा नाही. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून केंद्राकडून देण्यात येणाºया सूचना आणि आदेशांचा गोंधळ सुरू असल्याने त्याचा फटका नागरिकांना बसला आहे. राज्याराज्यांमध्ये नसलेला समन्वय याचा फटका आपल्या राज्यात जाणाºया नागरिकांना बसत आहे. सातत्याने होणाºया लॉकडाऊन उडल्यानंतरचा आराखडा केंद्राकडे तयार नसल्याचे आता तरी दिसून येत आहे. सक्षम पॉलिसी मेकर नसल्याचे सध्या तरी दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो. केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी पॅकेज जाहिर केले. हा आकड्याचा खेळ दिसून येतो. थेट किती लाभ मिळणार याबाबत स्पष्टता नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCentral Governmentकेंद्र सरकारDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हे