केंद्र सरकारने शेतमालाची आधारभूत किंमत वाढवावी

By Admin | Updated: July 22, 2014 19:24 IST2014-07-21T00:27:14+5:302014-07-22T19:24:46+5:30

केंद्र सरकारने कापूस, सोयाबीन, गहू, हरभरा, भुईमूग, धानाची आधारभूत किंमत वाढविण्याची मागणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांनी केली.

The central government should increase the basic price of the land | केंद्र सरकारने शेतमालाची आधारभूत किंमत वाढवावी

केंद्र सरकारने शेतमालाची आधारभूत किंमत वाढवावी

अकोला: केंद्र सरकारने कापूस, सोयाबीन, गहू, हरभरा, भुईमूग, धानाची आधारभूत किंमत वाढविण्याची मागणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. केंद्रातील मोदी सरकारने शेतकरी विरोधी धोरण अवलंबविले असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते देशमुख यांनी केला.

राज्य सरकारने केंद्र सरकाराला कापूस- ६ हजार ५0५, सोयाबीन- ३ हजार ९९५, गहू- २ हजार ७७५, हरभरा-३ हजार ८७७, तूर-४ हजार ९६२, धान २ हजार ७७0, ज्वारी- २ हजार ३६८, मूग-४ हजार ९६२ आणि उडीदची आधारभूत किंमत ६ हजार १0 रुपये करावी, अशी शिफारस केली होती. मात्र केंद्राने कापसाची ४ हजार ५0, सोयाबीन-२ हजार ५६0, गहूू-१ हजार ४00, भुईमूग-४ हजार, तूर-४ हजार ३५0, धान-१ हजार ३६0, ज्वारी-१ हजार ५३0,मूग- ४ हजार ६00 आणि उडीदची आधारभूत किंमत ४ हजार ३00 रुपये जाहीर केली आहे. गत वर्षभरात उत्पादन खर्च १५ ते १६ टक्क्यांनी वाढला असून, केंद्र सरकारने आधारभूत किंमत केवळ १ ते २ टक्केच वाढविल्या आहेत. वाढती महागाई आणि शेतकरीविरोधी धोरणामुळे राज्यातील जनतेचा मोदी सरकारकडून अपेक्षाभंग झाल्याची टीका अनिल देशमुख यांनी केली.

Web Title: The central government should increase the basic price of the land