शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मदत करावी - शरद पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2020 07:06 IST

खा. पवार यांनी रविवारी उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केला. तुळजापूर व लोहारा तालुका तसेच लातूर जिल्ह्यातील किल्लारी व आशिव येथील  परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी धीर देण्याचा प्रयत्न केला. (Sharad Pawar)

उस्मानाबाद/लातूर : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे़ सोयाबीन, तूर, ऊस आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे़ राज्य सरकार मदत करेलच, परंतु राज्याला काही मर्यादा आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने मदतीचा हात पुढे केला पाहिजे, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली. 

खा. पवार यांनी रविवारी उस्मानाबादलातूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केला. तुळजापूर व लोहारा तालुका तसेच लातूर जिल्ह्यातील किल्लारी व आशिव येथील  परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी धीर देण्याचा प्रयत्न केला.  शक्य तितकी व लवकर मदत देण्यासाठी आपण पाठपुरावा करणार आहोत़ परंतु, नुकसानीचे प्रमाण लक्षात घेता एकटे राज्य सरकार पुरणार नाही़ त्यासाठी केंद्राचीही मदत घ्यावी लागणार आहे. आम्ही लवकरच पंतप्रधानांची भेट घेऊन याविषयी चर्चा करु, अशी ग्वाही पवार यांनी शेतकऱ्यांना दिली.भूकंपावर मात केलीय, यातूनही सावरु - लोहारा, उमरगा तालुक्यातील भूकंपग्रस्त भागातही अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे़ येथील शेतकºयांशी बोलताना खा़ पवार म्हणाले, १९९३च्या भूकंपात या भागातील हजारो जीव गेले हे दु:ख विसरुन आपण उभे राहिलो आहोत़ त्याचप्रमाणे याही याही संकटातून उभे राहू़ धीर धरा, मार्ग काढू.सेना आमदाराची चेन गायब - उमरगा मतदारसंघाचे शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले हेही खा. शरद पवार यांच्यासमवेत होते़   गर्दीचा गैरफायदा घेत अज्ञाताने आ. चौगुले यांच्या गळ्यातील सोन्याची चेन लंपास केली. 

५० हजारांची मदत हवी : संभाजी राजे -खासदार संभाजीराजे यांनीही रविवारी तुळजापूर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त नुकसानीची पाहणी केली़ यावेळी त्यांनी सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी केली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसFarmerशेतकरीlaturलातूरOsmanabadउस्मानाबाद