शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाळा अभयारण्यावर केंद्र सरकारचा बुलडोझर

By admin | Updated: August 22, 2015 00:47 IST

मुंबई - नवी मुंबईला जोडणाऱ्या शिवडी - न्हावाशेवा सागरी सेतूसह विमानतळासाठी केंद्र सरकारने पनवेल नजिकच्या कर्नाळा पक्षी अभयारण्याचे क्षेत्र कमी तब्बल चार

नारायण जाधव, ठाणेमुंबई - नवी मुंबईला जोडणाऱ्या शिवडी - न्हावाशेवा सागरी सेतूसह विमानतळासाठी केंद्र सरकारने पनवेल नजिकच्या कर्नाळा पक्षी अभयारण्याचे क्षेत्र कमी तब्बल चार चौरस किमीने कमी करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी १७ जून २०१५ रोजी अधिसूचना चोरी चोरी चुपके चुपके हरकती व सूचना मागवल्या होत्या. मात्र या अधिसूचनेची कल्पना कुणालाही नसल्याने कितपत पर्यावरणवाद्यांच्या हरकती येतील, याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे या अभयारण्यातील आणि १४७ पक्षी आणि ३७ दुर्मिळ स्थलांतरीत पक्षांसह औषधी वनस्पतींच्या अस्तित्वावर गदा येण्याची भीती आहे.केंद्र सरकारचा हा निर्णय अंमलात आल्यानंतर अभयारण्याचे उरण आणि पनवेल तालुक्यातील १८ गावांच्या क्षेत्रातील क्षेत्र अवघे ० ते आठ चौरस किलोमिटर राहणार असल्याने त्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सध्या या अभयारण्याचे क्षेत्र सरसकट १२.१० चौरस किलोमिटर असून मुंबई नजिकचे ते एकमेव पक्षी अभयारण्य आहे. आधीच मुंबई -गोवा रस्त्याच्या दोन किमी रूंदीकरणात त्याचा गळा घोटला गेला आहे. आता तर त्याचे क्षेत्र ४० टक्के कमी केल्यास त्यास पक्षी अभयारण्य म्हणावे का? असा सवाल पक्षीप्रेमींकडून केला जात आहे. कारण नवी मुंबई विमानतळ आणि एसईझेडच्या विकासामुळे येथील पशू-पक्षांच्या अस्तित्वच धोक्यात येणार आहे. नव्या अधिसुचनेनुसार हे क्षेत्र काही ठिकाणी ० चौरस किलोमिटर राहणार असून जास्तीतजास्त ते ८ चौरस किलोमिटर राहणार आहे.याशिवाय या सागरी सेतूसाठी अरबी समुद्रातील चिर्ले नजिक सुमारे ४० हेक्टर तिवरांच्या जंगलाचे नष्ट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणजे नवी मुंबई विमानतळासाठी २५० हेक्टर, जेएनपीटीच्या विस्तारासाठी १४.४६ हेक्टर नंतर सागरी सेतूसाठी ४० हेक्टर क्षेत्र गृहीत धरले तर तिवरांचा मोठया प्रमाणात बळी जाणार आहे. यामुळे सागरी प्राणीमात्रांवरही विपरित परिणाम होणार आहे. समुद्रातील किटक आणि मत्स्य उत्पादनासह पृथ्वीवरील पशूपक्षी आणि वनस्पतींचा बळी या विमानतळासह सागरी सेतूमुळे जाणार असल्याने याविरोधात पर्यावरणप्रेमी काय भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.कर्नाळ्याचे क्षेत्र कमी करण्यासंदर्भात केंद्र सरकारने १७ जून ते १७ आॅगस्टपर्यंत हरकती व सूचना मागविल्या आहेत. ही अधिसूचन डॉ. जी. व्ही. सुब्रमण्यम यांच्या सहीने काढण्यात आली होती.