आरक्षणामुळे सेनेची पंचाईत
By Admin | Updated: August 17, 2014 02:23 IST2014-08-17T02:23:33+5:302014-08-17T02:23:33+5:30
दोनच नवख्या नगरसेविका महापौरपदाच्या स्पर्धेत उरल्याने शिवसेनेची गोची झाली आह़े परळच्या स्नेहल आंबेरकर आणि विक्रोळीच्या डॉ़ भारती बावदाने यांच्यामध्ये आता या पदासाठी चुरस आह़े

आरक्षणामुळे सेनेची पंचाईत
>मुंबई : आरक्षणामुळे जुने-जाणते स्पर्धेतून बाद झाल्यानंतर अडचणीत आलेल्या शिवसेनेच्या पालिकेतील कारभाराला आणखी एक धक्का बसला आह़े नगर विकास खात्याने महापौरपदाच्या सोडतीत मुंबईत अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षण आज जाहीर केल़े मात्र अशा दोनच नवख्या नगरसेविका महापौरपदाच्या स्पर्धेत उरल्याने शिवसेनेची गोची झाली आह़े परळच्या स्नेहल आंबेरकर आणि विक्रोळीच्या डॉ़ भारती बावदाने यांच्यामध्ये आता या पदासाठी चुरस आह़े
मुंबईचे ‘प्रथम नागरिक’पद मिळणो प्रतिष्ठेचे मानले जात़े त्यामुळे या पदासाठी शिवसेनेमध्ये इच्छुकांची यादी मोठी आह़े मात्र 2क्12मध्ये नगरसेवक सुनील प्रभू यांचे नाव या पदावर कोरले गेल़े त्यांचा कार्यकाळ 9 सप्टेंबर रोजी संपत असल्याने या स्पर्धेत असलेल्या अनेक नगरसेवकांच्या
आशा पुन्हा पल्लवित झाल्या
होत्या़ परंतु हे पद अनुसूचित जातीसाठी आरक्षित वॉर्डातून निवडून आलेल्या नगरसेविकेकरिता राखीव झाले आह़े
या आरक्षणातून निवडून आलेल्या दोनच महिला शिवसेनेत आहेत़ परळच्या स्नेहल आंबेरकर आणि विक्रोळीच्या डॉ़ भारती बावदाने यांच्यामध्ये आता या पदासाठी चुरस आह़े माजी नगरसेवक यशवंत जाधव यांच्या पत्नी व सभागृहातील आक्रमक भूमिकेमुळे चर्चेत असलेल्या यामिनी जाधव या पदाच्या प्रबळ दावेदार ठरल्या असत्या़ मात्र त्या खुल्या प्रवर्गातून निवडून आल्यामुळे त्यांची संधी हुकली आह़े
शिवसेना अडचणीत
2क्12च्या आरक्षणात शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवकांचे पत्ते कापले गेल़े त्यांच्या जागेवर निवडून आलेल्या त्यांच्या पत्नी, बहिणी, मुली पालिकेच्या कामकाजावर छाप पाडण्यात फारशा यशस्वी ठरलेल्या नाहीत़ त्यामुळे शिवसेनेचा कारभार सुनील प्रभू, राहुल शेवाळे आणि यशोधर फणसे यांच्याकडे सोपविण्यात आला होता़ त्यात राहुल शेवाळे खासदार म्हणून निवडून आल्याने पालिकेकडे त्यांचे लक्ष राहिलेले
नाही़ तर प्रभू आणि फणसे विधानसभा निवडणूक लढविण्याची दाट शक्यता आह़े
त्यामुळे हे दोघे आमदार झाल्यास शिवसेनेचा कारभार नवख्यांच्या खांद्यावर येऊन पडणार आह़े काही अपवाद वगळता नवीन नगरसेवकांच्या पाटय़ा अद्याप को:याच असल्याने शिवसेनेची चांगलीच पंचाईत होणार आह़े (प्रतिनिधी)
प्रभूंचे ‘विसजर्न’ होणार
गेली अडीच वर्षे सुनील प्रभू हे महापौरपदावर विराजमान होत़े प्रभू या आडनावामुळे त्यांचे अनेक निर्णयांबाबत प्रभू की लीला, प्रभू इच्छा, असे गमतीने म्हटले जात अस़े प्रभू यांच्या महापौरपदाचा कार्यकाळ 9 सप्टेंबर रोजी संपुष्टात येत आह़े तर 8 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असल्याने प्रभूंचे विसजर्न होणार, अशी चर्चा पालिका वतरुळात सुरू आह़े