शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

सिमेंटचे दर पहिल्यांदाच महागले तब्बल शंभर रुपयांनी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 5:37 AM

परवडणाऱ्या घरांच्या योजनेवर होणार परिणाम

- प्रशांत तेलवाडकर 

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत सिमेंटचे प्रतिगोणी दर तब्बल ४० टक्के म्हणजेच १०० रुपयांनी वाढले आहेत. या दरवाढीचा परवडणाऱ्या घरांच्या योजनेला फटका बसणार आहे. सिमेंट कंपन्यांनी निवडणुकीसाठी फंड दिल्यामुळे त्याची भरपाई ग्राहकांकडून करण्यात येत असल्याची व्यापाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे.

दीड महिन्यापूर्वी ५० किलो वजनाची सिमेंटची गोणी २६० ते २८० रुपये विकली जात होती. तिचा दर आता ३६० ते ३८० रुपयांपर्यंत केला आहे. औरंगाबाद सिमेंट डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष मनोज रुणवाल यांनी सांगितले की, एरव्ही भाव ५ ते १० रुपये कमी-जास्त होतात, पण पहिल्यांदाच दीड महिन्यात ११५ ते १३० रुपयांनी सिमेंट महाग होऊन किमती ४०० रुपयांच्या जवळ पोहोचल्या आहेत. त्यामुळे सिमेंटपासून तयार होणारे पाइप, टाइल्स, पेव्हरब्लॉक आदींच्या किमतीही वाढल्या आहेत. बांधकाम व्यावसायिकांना जीएसटीवर ६ टक्के रिबेट मिळत असे. १ एप्रिलपासून ते बंद करण्यात आले आहे. त्यामुळे फ्लॅटमागे साडेतीन लाख रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. परवडणाºया घरांच्या योजनांचे बजेटही महागणार आहे.

क्रेडाईची टीकासिमेंट बनविण्यासाठी लागणाºया कोणत्याही कच्च्या मालाच्या दरांमध्ये वाढ झालेली नाही, तरीही सिमेंटच्या दरांमध्ये अनपेक्षित वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीचा परिणाम रेडिमेड क्राँकीट, फरशी, विटा आदींवर होणार आहे. बांधकामाचा खर्च वाढणार आहे. सरकारने सिमेंटचे दर कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. तशी मागणी आम्ही सरकारला करणार आहोत.- राजीव परीख, अध्यक्ष, क्रिडाई महाराष्ट्र

टॅग्स :Inflationमहागाई