तिरंगा यात्रेचा जल्लोष, मुख्यमंत्र्यांचाही सहभाग

By Admin | Updated: August 15, 2016 04:58 IST2016-08-15T04:58:28+5:302016-08-15T04:58:28+5:30

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून वांद्रे-वरळी सी लिंकजवळील राष्ट्रध्वजापर्यंत तिरंगा यात्रा काढण्यात आली होती

Celebrating the tricolor, the Chief Minister also participated | तिरंगा यात्रेचा जल्लोष, मुख्यमंत्र्यांचाही सहभाग

तिरंगा यात्रेचा जल्लोष, मुख्यमंत्र्यांचाही सहभाग


मुंबई- स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वेसंध्येला जीव्हीके येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून वांद्रे-वरळी सी लिंकजवळील राष्ट्रध्वजापर्यंत तिरंगा यात्रा काढण्यात आली होती. रविवारी सायंकाळी ४ ते रात्री ७ यावेळेत झालेल्या तिरंगा यात्रेत खासदार पूनम महाजन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार पराग अळवणी आदी सहभागी झाले होते.
पूनम महाजन यांच्य तर्फे आयोजित तिरंगा यात्रेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवला. विशेष म्हणजे मोटारसायकल यात्रेमध्ये मुख्यमंत्र्यांनीही बुलेटवर स्वार होत आपला उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. या तिरंगा यात्रेमध्ये तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. त्यामूळे जल्लोषाला उधाण आले होते.

Web Title: Celebrating the tricolor, the Chief Minister also participated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.